Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / डॉ. पंडित विद्यासागर
डॉ. पंडित विद्यासागर
डॉ. पंडित विद्यासागर

डॉ. पंडित विद्यासागर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'भौतिकशास्त्र' विभागात १९७९ ते २०१५ या कालावधीत अध्यापनाचे आणि संशोधनाचे कार्य केले. या काळात त्यांनी भौतिकशास्त्र विभागप्रमुख, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ संचालक, ऊर्जा विभाग संचालक, जीववैद्यक प्रणाली सदस्य, व्यवस्थापन परिषद अशी इतरही अनेक महत्त्वाची पदे भूषविली. २०१३ ते २०१८ या कालावधीत ते स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात मराठवाडा विद्यापीठास नॅकचा 'अ' दर्जा प्राप्त झाला. त्यांनी जैवभौतिकशास्त्रात केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि १९ विद्यार्थ्यांना एम.फिल. पदवीसाठी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. दोन वेळा महाराष्ट्र भाषा सल्लागार समिती सदस्य, तसेच खाजगी विद्यापीठ शिफारस समिती महाराष्ट्र राज्य, सदस्य म्हणून काम पाहिले.
विज्ञानप्रसाराच्या कार्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, मराठी विज्ञान परिषद आणि लोकविज्ञान संघटनेच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग

डॉ. पंडित विद्यासागर ह्यांची पुस्तके