Home / Authors / डॉ. अनंत सरदेशमुख | Dr. Anant Sardeshmukh
डॉ. अनंत सरदेशमुख | Dr. Anant Sardeshmukh

डॉ. अनंत सरदेशमुख मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (MCCIA) चे माजी महासंचालक आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. बजाज फायनान्स, दीपक नायट्राईट, ट्वेंटीएथ सेन्चुरी कायनेटिक फायनान्स, एम. आय. टी. व इतर संस्थात त्यांनी सुमारे चाळीस वर्षाचा उच्चपदस्थ कार्यानुभव प्राप्त केला. सध्या एमकेसीएलच्या व इतर काही बोर्डांचे ते सदस्य आहेत व त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व काही
इतर शिक्षण संस्थांच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. त्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन व व्यवस्थापन शास्त्रातील दोन पदव्युत्तर पदव्या, व्यवस्थापनशास्त्रातील पीएच्.डी. आणि कॉर्पोरेट फायनान्स, नॉनबँकिंग
फायनान्स, सामान्य व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, सरकारी संबंध, व्यवस्थापन धोरण, या क्षेत्रांमध्ये व्यापक अनुभव आणि कौशल्य प्राप्त केले आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग, स्टार्टअप या क्षेत्रांचा विशेष अभ्यास केला आहे व त्यात ते सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांवर उद्योगाचे प्रतिनिधित्व केले. विविध वृत्तपत्रातून ते विस्तृत लिखाण करतात. एक कुशल नेता जो आपल्या यशाचे श्रेय देताना म्हणतो, `माझे यश हे मी ज्या कुशल संघांसोबत काम केले, ज्यांचे सदस्य मी फुलांप्रमाणे निवडले त्यांच्यामुळेच आहे.’

डॉ. अनंत सरदेशमुख
anant.sardeshmukh@gmail.com