Home / Authors / Bhaskar Chandavarkar
Bhaskar Chandavarkar
Bhaskar Chandavarkar

भास्कर चंदावरकर (जन्म : पुणे, १६ मार्च १९३६; - पुणे, २६ जुलै २००९) हे एक भारतीय संगीतकार आणि संगीताच्या परंपरांचे अभ्यासक होते. विचारमूलक संगीतसाधना हा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य गाभा होता. संगीतासंदर्भात त्यांनी केलेले तात्त्विक विवेचन आजही प्रमाण मानले जाते. स्पष्ट आणि परखड विचार, हेही त्यांचे वैशिष्ट्य होते.

त्यांनी २००४ साली नंदिनी संन्याल यांच्या स्मरणार्थ झालेल्या व्याख्यानमालेत `चित्रपट संगीत' या विषयावर भाषण केले होते.

ग्रंथलेखन

प्रयोगशील संगीतरचनाकार, सतारवादक आणि विचारवंत पंडित भास्कर चंदावरकर यांनी संगीतावरील विचारमूलक विवेचन असणारा ‘चित्रभास्कर’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. चंदावरकर यांनी लिहिलेल्या संगीतविषयक निबंधांचा एकत्रित समावेश या ग्रंथात आहे.

भास्कर चंदावरकर यांचे संगीत असलेले चित्रपट

* अरविंद देसाई की अजब दास्तॉं
* अल्बर्ट पिंटोको गुस्सा क्यूं आता है
* कैरी
* घाशीराम कोतवाल (नाटक)
* खंडहर (हिंदी)
* जय जवान जय मकान
* थोडासा रुमानी हो जायें
* बायो
* भक्त पुंडलीक
* माती माय
* मायादर्पण
* मायामृग (हिंदी)
* रावसाहेब
* वंशवृक्ष
* सरीवर सरी
* सर्वसाक्षी (हिंदी)
* सामना

Bhaskar Chandavarkar ह्यांची पुस्तके