Home / Authors / Baban Bhinde | बबन भिंडे
Baban Bhinde | बबन भिंडे
Baban Bhinde | बबन भिंडे

ग्रामीण आणि शहरी भागात आपल्या कादंबर्‍यांमधून समर्थपणे वाचकांसमोर आणणारे कादंबरीकार. ‘कॉमन मॅन’ कादंबरीतून महानगरात जगणार्‍या सर्वसामान्य माणसाची कथा ते सांगतात, तर ‘लँडमाफिया’मधून बदलते ग्रामीण वास्तव, नात्यांचा गुंता सोडवताना नात्यांची माती होत भोवताली वाढलेली गुन्हेगारी याचे भयाण चित्र रेखाटतात. या त्यांच्या कादंबर्‍या वाचकांना अंतर्मुख करतात. आजचे समाजवास्तव मांडताना ते वर्तमानाचा वेध घेतात. जे अनुभवले, तेच लिहिणारा हा कादंबरीकार आजचा काळ आपल्या शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करतो. आधुनिक युगात जागतिकीकरणातून माणसाने काय कमावले आणि काय गमावले, याचे निरीक्षण नोंदवतानाच यातून निर्माण झालेल्या जीवनाच्या गुंतगुंतीचे दर्शन वाचकाला त्यांच्या कादंबर्‍या वाचताना होते.

* कादंबरीबरोबरच कथा, नाटक, बालसाहित्य...अशा वाङ्मयप्रकारांतूनही ते सातत्याने गंभीरपणे लिहितात.

प्रकाशित साहित्य

कादंबरी :
* सत्याग्रह
* कॉमन मॅन
* लँडमाफिया
* कळसूत्री

कथासंग्रह :
* बलुत्याची व्हाण

बालकुमार वाङ्मय (कादंबरी) :
* कॅप्टन कावेरी मंगळावर
* पाकुळी
* दौलतबंकी आणि त्याचा खजिना

नाटक :
* बळी

संपादित (शिरीष म्हेत्रे यांच्या सहयोगाने) : * आम्ही मराठीचे प्राध्यापक

Baban Bhinde | बबन भिंडे ह्यांची पुस्तके