Home / Authors / B. G. Shirke | बी. जी. शिर्के
B. G. Shirke | बी. जी. शिर्के
B. G. Shirke | बी. जी. शिर्के

बाबूराव गोविंदराव शिर्के (ऑगस्ट १, इ.स. १९१८ - ऑगस्ट १४, इ.स. २०१०) हे मराठी बांधकाम व्यावसायिक होते.

*** जीवन
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्याश्या गावात शिर्क्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी कमवा व शिका हे तत्त्व आचरत शिक्षण पूर्ण केले. जून ६, इ.स. १९४३ रोजी त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळवली. वाई-पसरणी परिसरात व शिक्षणाची परंपरा नसणाऱ्या स्वतःच्या घराण्यात शिकून अभियंता झालेले ते पहिलेच होते.

*** शिक्षणानंतर नोकरीत अख्खी कारकीर्द घालवण्याऐवजी स्वतःची कंपनी उभारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सुरुवातीला छोट्या-मोठ्या कंपन्यांत नोकरी करत उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. सप्टेंबर ९, इ.स. १९४४ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी सुप्रीम कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी सुरू केली. कंपनी सुरू केल्यानंतर इ.स. १९४४ च्या सुमारास सैन्याकडून कामे मिळविण्यासाठी ते एका सैनिकी अधिकाऱ्याला त्याच्या घरी भेटले होते. सुदैवाने त्या अधिकाऱ्यानेही शिर्क्यांची कष्टाची तयारी पाहून त्यांना बांधकामांची कंत्राटे मिळवून दिली. पुढे इ.स. १९४५ साली कोल्हापूर कारागृहाच्या बांधकामाचे मोठे कंत्राट त्यांना मिळाले.

*** त्याच सुमारास इ.स. १९४७ साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांनी विजया शिंदे यांच्याशी लग्न केले. त्यांच्या पत्नीने शिर्क्यांना उद्योगात वेळप्रसंगी सल्ले देऊन उद्योगाच्या उभारणीस हातभार लावला. सिपोरेक्स कंपनीच्या उभारणीमध्ये सौ. शिर्के यांचा मोठा सहभाग होता. इ.स. १९५३ सालापर्यंत पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाची पहिली मोठी इमारत, वीरचे धरण अशी कामे त्यांनी केली व या सुमारास त्यांचा व्यवसाय स्थिरावला होता. इ.स. १९६२ ते इ.स. १९८१ सालापर्यंत किर्लोस्कर कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे शंतनुराव किर्लोस्कर यांनी शिर्क्यांना विना-निविदा देऊ करत, त्यांच्या बांधकाम गुणवत्तेवर विश्वास टाकला.

*** व्यवसायिक यश
सिपोरेक्स ही बांधकामाचे साहित्य बनवणारी कंपनी भारतात स्थापताना शिर्क्यांना विविध गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. शासकीय कारभार, नोकरशाहीतील भ्रष्टाचार, परवाने मिळवण्यातील तांत्रिक अडचणी, भांडवलाची मोठी आवश्यकता यांतून त्यांना वाट काढावी लागली. या सर्व प्रश्नांना तोंड देऊन त्यांनी इ.स. १९७२ साली कारखान्याचे अधिकृत उत्पादन सुरू केले. इ.स. १९७४ साली दुबईतल्या पहिल्या परदेशी कंत्राटाने कंपनी तरली. पुढे १९९३ साली शिर्क्यांच्या कंपनीने पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी उभारली. मोठ्या प्रमाणावरचे हे काम बी.जी. शिर्के कंपनीने केवळ एक वर्षात पूर्ण केले.

B. G. Shirke | बी. जी. शिर्के ह्यांची पुस्तके