Home / Authors / Arvind Paranjape | अरविंद परांजपे
Arvind Paranjape | अरविंद परांजपे
Arvind Paranjape | अरविंद परांजपे

अरविंद शंकर परांजपे - बीएस्सी, एफसीएमए, एसीएस

* सार्थ वेल्थ प्रा. लि. या म्युच्युअल फंड वितरण करणार्‍या कंपनीचे संचालक.
* गेली २० वर्षे अर्थसल्लागार म्हणून कार्यरत.
* मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या गुंतवणूकदार तक्रार निवारण मंचाचे सदस्य.
* फिलिप्स इंडियामध्ये १० वर्षे मॅनेजमेंट अकौंटंट. नंतर लहान आणि मध्यम कंपन्यांकरता कॉस्ट मॅनेजमेंट सल्लागार.
* दोन लिस्टेड कंपन्यांचे कंपनी सेक्रेटरी म्हणून आयपीओचे व्यवस्थापन.

प्रकाशित साहित्य :

* धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड - सकाळ प्रकाशन - ८ आवृत्त्या - (१०,००० प्रतींची विक्री)
* विपुल संपत्तीचे १३ मार्ग (अनुवाद) - वेस्टलँड प्रकाशन
* Prosperity through Mutual Funds
* सकाळ, अर्थमंथन, लोकमत, व्यापारी मित्र, लोकसत्ता इ. नियतकालिकांत गुंतवणूक आणि भारतीय अर्थव्यवस्था याविषयी स्फुटलेखन.
* पुणे आकाशवाणीकरिता ‘अर्थजिज्ञासा’ हे सदर आणि ‘ये रे ये रे पैसा' ही गुंतवणूकविषयक रंजक संवादांची मालिका.

अन्य उपक्रम
* `सामान्यांकरता वैयक्तिक अर्थनियोजन’ आणि `कंपन्यांचे वित्तव्यवस्थापन’ या विषयांवर अनेक व्याख्याने.
* `दाबके ट्रस्ट’ चे विश्वस्त.
* ‘कल्पकता कशी वाढवावी’, आणि ‘परिणामकारकतेच्या सवयी’ यांवर कार्यशाळा.
* शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी ‘कलापिनी’, तळेगाव या संस्थेतर्फे कार्यशाळा आणि व्याख्यानांचे आयोजन.
* तबलावादक म्हणून देशात आणि परदेशात अनेक कार्यक्रम.
* सीएस कलामंडळ आणि मॅनेजमेंट अकाउंटंट अभ्यासमंडळ यांचे संयोजन.

Arvind Paranjape | अरविंद परांजपे ह्यांची पुस्तके