Home / Authors / Arun Mande | अरुण मांडे
Arun Mande | अरुण मांडे
Arun Mande | अरुण मांडे

डॉ.अरुण विनायक मांडे हे अहमदनगर येथे स्थायिक असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.

* डॉ. अरुण मांडे यांना प्रदूषण या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९८९-९०

* गुणसूत्र या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९९५-९६ मिऴाला आहे.

* एकांकिका लेखनासाठी नाट्यदर्पण प्रतिष्ठान पुरस्कार १९९२-९३ मिळाला आहे.

* विज्ञान गमती या पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार १९९४-९५,

* अमाणूस या विज्ञानकथा संग्रहाला स्व. मामा कडलक साहित्य पुरस्कार १९९८,

*** पुणे विद्यापीठ चिपळूणकर विज्ञान पुरस्कार, आपट्याचं पान या कादंबरीला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे
* पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील पुरस्कार २००८,
* संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी पुरस्कार २००८,
* अहमदनगर जिल्हा वाचनालय पुरस्कार २००९,
* पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार २००९,
* डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे व श्रीमती ऋतबाई हिवाळे पुरस्कार २००८-०९,
* अनघा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे कादंबरी पुरस्कार २०१०.
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा म.ना. गोगटे पुरस्कृत गो.रा. परांजपे वार्षिक ग्रंथकार पुरस्कार २०१०.

* वर्तमानपत्रात आरोग्यविषयक स्तंभलेखन. कथासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद अशी मिळून एकंदर ४० पुस्तके प्रकाशित.

*** डॉ. अरुण मांडे यांची आरोग्यविषयक भाषांतरित पुस्तके

* अर्धशिशी अर्थात्‌ मायग्रेन आणि डोकेदुखी (मूळ लेखक डॉ. जोसेफ कॅन्डेल व डॉ. डेव्हिड सुडेर्थ)
* आरोग्यदायी जीवनसत्त्वे (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
* आहाराद्वारे उपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
* कॅन्सर आणि निसर्गोपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
* गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय)
* चार आठवड्यात वजन कमी करा (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन)
* चाला... 'फिट' राहा (मूळ लेखक मॅगी हम्फेरीस व लेस स्नोडॉन)
* तणावमुक्त जगण्यासाठी (मूळ लेखक डॉ. ख्रिश्चन श्रायनर)
* निसर्गोपचार लहान मुलांच्या आजारासाठी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
* निसर्गोपचारे मधुमेहावर नियंत्रण (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
* नैसर्गिक सौंदर्यसाधना (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
* पाठदुखी विसरा (मूळ लेखक डॉ. ए.पी. सिंग व डॉ. यतीश अगरवाल)
* फिटनेस मंत्र-टीन एजर्ससाठी (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन)
* बहुगुणी वनौषधी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
* योगिक प्राणायाम (मूळ लेखक डॉ. के.एस. जोशी)
* वयावर मात (मूळ लेखक डॉ. पॉल गालब्रेथ)
* संगोपन बाळ-गोपाळांचे (मूळ लेखक डॉ. सुभाष आर्य)
* सुजाण संगोपन (मूळ लेखक डॉ.उमेश शर्मा)
* हार्ट अटॅक आणि सुखी जीवन (मूळ लेखक डॉ. टॉम स्मिथ)
* हील युवर बॉडी (मूळ लेखक लुईस एल. हे )
* हृदय-स्वास्थ्य (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय)

Arun Mande | अरुण मांडे ह्यांची पुस्तके