Home / Authors / Apurva Pradeep Joshi | अपूर्वा प्रदीप जोशी
Apurva Pradeep Joshi | अपूर्वा प्रदीप जोशी

‘आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग' या प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका डॉ. अपूर्वा जोशी या रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सिंल्टग प्रा. लि. या कंपनीच्या टेक्नॉलॉजी व ड्यू डिलिजन्स विभागाच्या प्रमुख आहेत. त्या भारतातील वयाने सर्वांत लहान अशा सर्टिफाइड फोरेन्सिक अकाउंिंटग प्रोफेशनल आणि सर्टिफाइड फ्रॉड्स एक्झॅमिनर ठरल्या होत्या. अलीकडेच गोल्डमन सॅक फाउंडेशन आणि आयआयएम बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांची निवड ‘टेन थाउजंड विमेन' (दहा हजार स्त्रिया) या प्रतिष्ठेच्या जागतिक उपक्रमातील सदस्य म्हणून झाली आहे. कॉम्प्युटर हॅकिंग फोरेन्सिक इन्वेस्टिगेटर संघटनेच्या जागतिक सल्लागार समितीवर निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. नुकतीच त्यांची नियुक्ती, डीईएस पुणे युनिव्हर्सिटी या नव्या विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून झाली आहे.

रिस्कप्रो संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी अपूर्वा जोशी यांनी फ्रॉड एक्सप्रेस ही स्वत:ची स्टार्टअप सुरू केली होती. कालांतराने ती रिस्कप्रो कंपनीत विलीन करण्यात आली. भारताच्या कॉर्पोरेट जगात आपल्या संशोधनक्षमतेमुळे प्रसिद्ध झालेल्या अपूर्वा जोशी या सहा पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संपादन केलेल्या व्यावसायिक यशाची नोंद प्रसिद्ध कॉर्पोरेट लेखिका श्रीमती रश्मी बन्सल यांनी आपल्या ‘अराइज, अवेक' या प्रसिद्ध पुस्तकात घेतली आहे. डॉ. दीपक शिकारपूर यांच्या पुस्तकातही अपूर्वा जोशींच्या कार्यकुशलतेची नोंद घेण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक मंदार कुलकर्णी यांनी चालू केलेल्या ‘विश्वसंवाद' या पॉडकास्ट मालिकेत अपूर्वा जोशींची मुलाखत २०२०मध्ये घेतली होती. त्यानंतर ‘निवडक विश्वसंवाद' या २०२२मध्ये राजहंस प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात ही मुलाखत समाविष्ट करण्यात आली.

Apurva Pradeep Joshi | अपूर्वा प्रदीप जोशी ह्यांची पुस्तके