Home / Authors / Anuradha Prabhudesai, Trans.: Shirish Sahasrabuddhe | अनुराधा प्रभुदेसाई, अनु.: शिरीष सहस्रबुद्धे
Anuradha Prabhudesai, Trans.: Shirish Sahasrabuddhe | अनुराधा प्रभुदेसाई, अनु.: शिरीष सहस्रबुद्धे

केवळ पर्यटक म्हणून २००४ साली लडाखला गेल्या असताना '१९९९ चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले नाही की काय' या विचाराने सौ. अनुराधा प्रभुदेसाई व्यथित झाल्या आणि त्यातूनच २००९ साली 'लक्ष्य फाउंडेशन'ची निर्मिती झाली. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी त्यांनी २०१२ साली बँकेतील अधिकारीपादापासून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ या कार्याची धुरा शिरावर घेतली.

* २००४ सालापासून श्रीनगर, लदाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाममधील आघाडीवरील ठाण्यांवर जाऊन त्यांनी सैनिकांशी संवाद साधला आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत' असा विश्वास सैनिकाना दिला आहे.

* तरुणांमध्ये देशप्रेम व सैन्यदलाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे व देशप्रेमाची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटत रहावी, यासाठी 'लक्ष्य फाउंडेशन' तर्फे त्या विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात.

*** उपक्रम

* 'ऋणानुबंध सैनिकांशी - कारगिल शौर्यगाथा' : दृक श्राव्य सादारीकरण. (शाळा, महाविद्यालये, कॉरपोरेट ऑफिसेस, क्लब्ज अशा अनेक ठिकाणी ९००हून जास्त प्रयोग.

* 'सैनिक माझा .........', 'सैनिकांसोबत दिवाळी' आणि 'एक पणती - एक सैनिक' : सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारे कार्यक्रम.

* 'युवाप्रेरणा' : सैन्यदलातील अधिकारी व शौर्यपदकप्राप्त सैनिकांना आमंत्रित करून तरुणांशी संवाद.

* ऑपरेशन विजय - कारगिल शौर्यगाथा' : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गोमंतक भारती, इयत्ता ११ वी या क्रमिक पुस्तकात समाविष्ट पाठ.

* आयबीएन लोकमत, झी २४ तास, सह्याद्री, झी मराठी अशा विविध वाहिन्यांवर मुलाखती.

* TED-EX-Talk - 'Are You Dangerous Optimist' अर्थात 'भीषण आशावाद सैन्यदलाचा' या You Tube वरील कार्यक्रमासाठी त्याना निमंत्रित केले गेले होते. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट वक्ता म्हणून मानांकन देण्यात आले आहे. सदर कार्यक्रम You Tube वर उपलब्ध आहे. २०१६ च्या TED-EX-Talk साठी बिट्स पिलानी- राजस्थान यांच्याकडून त्यांना आमंत्रित करण्यात आले.

* त्यांच्या हिंदीमधील कविता सैनिकांच्या मनाला भिडणा-या असून या कवितांच्या कित्येक प्रती आजही सैनिक मागवून घेत असतात.

* 'लक्ष्य फाउंडेशन' तर्फे प्रकाशित कारगिल युध्दातील ११ वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तिकांच्या ७७,००० प्रती आतापर्यंत विविध शाळांमध्ये वाटल्या गेल्या आहेत.

* 'A Salute to Our Heroes (इंग्रजी) व 'सलाम मृत्यंजयांना' (मराठी) ही त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील मराठी पुस्तकाच्या १३५०० प्रती महाराष्ट्राच्या खेडेगावांतील शाळांना पाठवल्या गेल्या आहेत., तर इंग्रजी पुस्तकाची व्दितीय आवृत्ती २६ जुलै २०१५ रोजी द्रास येथे कारगिल विजयदिनाच्या सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली,

* See Your Hero, Know Your Hero : कारगिल युद्धातील तीस योद्ध्यांची अर्कचित्रे आणि माहितीचा समावेश असलेल्या संचाचे द्रास येथे विजयदिन सोहळ्यात प्रकाशन.

* 3 Cs 4 Ds ह्या नावाने एका अभ्यासक्रमाची बांधणी केली असून पुण्यातील मान्यताप्राप्त MITSOB ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये तो २०१७ पासून सुरू झाला आहे.

श्री. * शिरीष सहस्रबुद्धे :- शिक्षण :- एम.ए. इंग्रजी, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट

कार्यानुभव

माणूस नियतकालिकातून लेखनाला सुरुवात, किर्लोस्कर आणि मनोहर अशा नामांकित नियतकालिकांमध्ये लेखन.
सकाळ पेपर्स प्रा.लि आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर या नामांकित संस्थांमध्ये अधिकार पदावर काम केले आहे.
२००६ पासून सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टीट्यूट ऑफ सिंबायोसिस आणि सिंबायोसिस इन्स्टीट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेस या दोन संस्थांचे संचालक म्हणून काम.
राजहंस प्रकाशनातर्फे अनेक पुस्तकांचा अनुवाद.
राजहंस प्रकाशनामध्ये संपादक म्हणून कार्यरत.
पुस्तकलेखन

वाट चुकलेली माणसं
लघुउद्योग मार्गदर्शक
सेन्ट्रल एक्साइज आणि लघुउद्योग
बखर कॉंग्रेसची
अनुवादित

मराठीतून इंग्रजी

The Miracle of work
The Road
The Soldier
National Ideologies and Politics.
इंग्रजीतून मराठी

धर्म आणि राजकारण
भारतातील वाद-वादळे
जमशेटजी टाटा यांचे भारतप्रेम
जेआरडी-मी पाहिलेले
ठाकरे विरुद्ध ठाकरे
हॅरी पॉटर आणि शापित पुत्र
व्यक्ती, संस्था, प्रक्रिया

Anuradha Prabhudesai, Trans.: Shirish Sahasrabuddhe | अनुराधा प्रभुदेसाई, अनु.: शिरीष सहस्रबुद्धे ह्यांची पुस्तके