Home / Authors / Ajit Thosar | अजित ठोसर
Ajit Thosar | अजित ठोसर
Ajit Thosar | अजित ठोसर

* अजित ठोसर यांचे शिक्षण आणि करियर आयटी क्षेत्रात झालेले आहे. लेखन, दिग्दर्शन, गायन, संवादिनीवादन, वाचन असे त्यांचे छंद आहेत.

* आत्तापर्यंत त्यांनी अनेक एकांकिका, स्किट आणि शॉर्टफिल्मचे लेखन केले आहे. `स्टार प्रवाह' या वाहिनीवर सादर झालेल्या
`कॉमेडी-बिमेडी’ या मालिकेमध्ये स्किट प्रसारित करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. त्यांचे लेखन मुद्देसूद व रंजक आहे. लेखनशैली खुमासदार आणि मिश्कील स्वरूपाची आहे. गंभीर विषय िंकवा सामाजिक समस्या हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी आहे. विनोदी लेखन ही त्यांची व्यक्तिगत आवड आहे.

* त्यांनी काही शॉर्टफिल्मचे दिग्दर्शनही केलेले आहे. कामाचे पद्धतशीर नियोजन, टीमवर्क, कामात वक्तशीरपणा, विषयाच्या अभ्यासाबरोबरच तर्कसंगतीचा विचार करण्यास प्राधान्य अशा कौशल्यांमुळे दिग्दर्शनातही त्यांनी प्रभुत्व मिळवलेले आहे.

* `मिरॅकल्स फिल्म्स’ निर्मित आणि प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित युथट्युब’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक
आणि साहाय्यक लेखक म्हणून काम पाहिलेले आहे.

* त्यांच्या स्वत:च्या संकल्पनांवर आधारित तीन चित्रपटांच्या संहिता लिहून पूर्ण झाल्या आहेत. त्यांपैकी दोन संकल्पना धम्माल विनोदी आहेत आणि एक संकल्पना कॉर्पोरेट लाइफवर आधारित आहे. यथावकाश त्या प्रदर्शित करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

* विनोदांचा संग्रह करण्याचा त्यांचा छंद आहे. स्वत: संग्रहित केलेल्या १,१११ विनोदांचे `टवाळखोरी’ नावाचे पुस्तक यापूर्वीच प्रकाशित झालेले आहे. विनोदांचा संग्रह अजूनही चालू आहे आणि लवकरच पुढील (आणि अर्थातच नवीन) १,१११ विनोदांचा संग्रहही पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे.

* या व्यतिरिक्त त्यांना भावगीते, भक्तिगीते, अभंग, नाट्यगीते गाण्याची आवड आहे. त्यांनी गायनाचे स्वतंत्र कार्यक्रमही केले आहेत.

* संवादिनी (हार्मोनियम) वादनातही त्यांचे प्रावीण्य आहे. त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली तसेच कीर्तनाचे कार्यक्रम यांमध्ये संवादिनीची साथ केली आहे.

* पुस्तके विकत घेऊन वाचणे हीपण त्यांची एक आवड आहे. १०००पेक्षा अधिक पुस्तके त्यांच्या व्यक्तिगत संग्रहात आहेत.

Ajit Thosar | अजित ठोसर ह्यांची पुस्तके