Home / Authors / Achyut Godbole / Dr.Madhavi Thakurdesai
Achyut Godbole / Dr.Madhavi Thakurdesai
Achyut Godbole / Dr.Madhavi Thakurdesai

जन्मतारीख: 15 ऑगस्ट 1950

शिक्षण: केमिकल इंजिनीयर, IIT, मुंबई

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. बोर्डरूम
२. नादवेध
३. किमयागार
४. अर्थात
५. नॅनोदय

अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

शैक्षणिक अर्हता
* दहावीच्या परीक्षेत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण .
* पहिली ते आय.आय.टीच्या जवळजवळ सर्व परीक्षांत त्यांनी गणितात सर्वोच्च गुण पारितोषिके मिळवली.
* भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून १९७२ साली उत्तीर्ण झालेले (आयआयटीचे) केमिकल इंजिनिअर आहेत.

*** कारकीर्द
* अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार म्हणून पदे सांभाळली;

* अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीने काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार ग्रंथही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, , मानसशास्त्र , या विषयात लिखाणाला सुरुवात केली.

*** अच्युत गोडबोले यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
* ‘मनकल्लोळ भाग १ व २ (सहलेखिका नीलांबरी जोशी)’ या पुस्तकाला मसापचा पुरस्कार (२६-५-२०१७)
* ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, नॅनोदय’ आणि ‘मनात’ या पुस्तकांना राजशासनासह अनेक मानाचे पुरस्कार.
* आय.बी.एम.तर्फे दोनदा, भारताच्या पंतप्रधानांकडून दोनदा पुरस्कार.
* उद्योगरत्‍न पुरस्कार
* आयआयटीचा प्रचंड मानाचा ‘डिस्टिंग्विश्ड ॲल्युमिनस’ पुरस्कार
* भीमसेन जोशी यांच्या हस्ते कुमार गंधर्व पुरस्कार.
* अनेक मान्यवर संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार
* TED या प्रचंड प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘युवा साहित्य-नाट्य संमेलना’चे अध्यक्षपद
* वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात आणि बहुरंगी बहर[३][४][५] यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.


डॉ. माधवी ठाकुरदेसाई या मराठी लेखिका आहेत. या कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या शाखाप्रमुख आहेत.

*** पुस्तके
* गणिती (सहलेखक अच्युत गोडबोले)
* नॅनोदय (सहलेखक अच्युत गोडबोले). (या पुस्तकाला न.चिं केळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळाला आहे.)
* प्रकाशवेध ((या पुस्तकाला २०१७ साली महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.)

Achyut Godbole / Dr.Madhavi Thakurdesai ह्यांची पुस्तके