Home / Authors / Abhay Sadavarte
Abhay Sadavarte

डॉ. अपातुकथा शिवतनू पिल्लई हे संरक्षण उत्पादनांच्या क्षेत्रातले नाणावलेले तंत्रज्ञ तर आहेतच, शिवाय जगातल्या सर्वोत्तम क्रूझ क्षेपणास्त्र `ब्राह्मोस'चे आरेखनही त्यांनीच केले आहे. कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या प्रक्षेपक वाहनांच्या उभारणीचा `इदााो'मधला आणि नंतर क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाचा `डीआरडीओ'मधला सुमारे चार दशकांपेक्षाही अधिक समृद्ध अनुभव
त्यांच्या पाठीशी आहे. भारताच्या अवकाश संशोधन आणि क्षेपणास्त्रांचा विकास या दोन्ही कार्यक्रमांना सुनिश्चित अशी दिशा देणार्‍या डॉ. विक्रम साराभाई, प्रा. सतीश धवन आणि डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांसह प्रत्यक्ष काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. अवकाशात विहार करू शकणार्‍या विविध यंत्रणांची उभारणी करणार्‍या क्षेत्रातील एक अधिकारी विशेषज्ञ अशी ख्याती त्यांनी
मिळवली आहे. वैविध्यपूर्ण वातावरणातले अनेक प्रकल्प एकाच वेळी सांभाळत असताना संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रातील अनेक आघाड्या, उद्योगजगत आणि शैक्षणिक संस्था या सर्वांमध्ये सुसूत्रता राखण्याचे असाधारण कौशल्यही त्यांच्याकडे आहे. परिणामी अत्यंत कळीच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास घडवून ते प्रत्यक्ष उपयोगातही आणणे आपल्याला शक्य झाले आहे.

क्षेपणास्त्रे, पाण्याच्या पोटात काम करताना लागणारी संवेदके (सेन्सर्स) इत्यादी कळीच्या क्षेत्रात विकसित केल्या गेलेल्या तंत्रज्ञानाची उदाहरणे आहेत. या सगळ्या तांत्रिक प्रगतीची परिणती ब्राह्मोससारखा एक साहसी आणि अनोखा प्रकल्प उत्क्रांत होण्यात आणि पुढे तो यशस्वी होण्यात झाली आहे. शत्रूवर निर्णायक घाव घालू शकणारे ब्राह्मोस भारतीय लष्कराच्या भात्यातले एक प्रमुख आणि यशस्वी अस्त्र आहे.

पिल्लई हे कलामांचे सहलेखक तर आहेतच; शिवाय त्यांची स्वत:ची ग्रंथसंपदाही आहे. जगातल्या भारतीय शैक्षणिक संस्थांसह अनेक नामांकित शिक्षणसंस्थांनी पिल्लई यांना मानद डॉक्टरेटची पदवी देऊन त्यांच्या कामाची सुयोग्य दखल घेतली आहे.

`पद्मश्री' आणि `पद्मभूषण' यासह अनेक मानसन्मानांचे ते धनी आहेत. `ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप' या सन्मानाने रशियन संघराज्याच्या सरकारनेही त्यांचा गौरव केला आहे.

Abhay Sadavarte ह्यांची पुस्तके