विनया खडपेकर

 

एम. ए. मराठी १९७२ (मुंबई विद्यापीठ )

ऑगस्ट १९७७ वसंत मासिकात पहिला लेख : दलित साहित्याविषयी थोडेसे

जानेवारी १९७८ पासून मार्च १९८३ पर्यंत माणूस साप्ताहिकात रंगभूमी सदरात नाटक अभिप्राय लेखन. याच साप्ताहिकात मुंबई वार्ता, स्वयंसेवी संस्थांचे कायकर्ते, नाटककार यांच्या मुलाखतीही सादर केल्या.

म. टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, केसरी, स्त्री, किर्लोस्कर, वाङमय शोभा,  कालनिर्णय, रसिक, विवेक या नियतकालिकांत विविध प्रकारचे स्फुट लेखन आणि कथालेखन. दूरदर्शन, आकाशवाणीवरील कार्यक्रमांत सहभाग.

पुस्तके

 

 • भिंती (लघुकादंबरी १९८४)
 • स्त्री-स्वातंत्र्यवादिनीः विसाव्या शतकातले परिवर्तन (सामाजिक इतिहास १९९१)
 • प्रतिसाद (कथासंग्रह – जून १९९६)
 • मातृसेवा संघ (संस्था परिचय-मार्च २०००) 
 • सूत्रचालक (अनुवादित कादंबरी. मूळ लेखकः मनोहर माळगावकर. ऑक्टोबर २०००)
 • एक होती बाय (अनुवादित कादंबरी. मूळ लेखकः सुरेन आपटे. २००२)
 • ज्ञात – अज्ञात अहिल्याबाई होळकर (चरित्र मे२००७) 

कार्य

 

 • १९६६ ते १९७२ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
 • १९८४ ते १९९२ मुंबईत स्त्री-उवाच या स्त्रीवादी गटाशी संबंध
 • १९७१ ते १९९३ रिझर्व बॅंकेत नोकरी
 • १९९४ ते २००२ पुणे येथील स्वयंसेवी संस्था वंचित विकास, चाणक्य मंडल, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यांच्याशी संबंध
 • २००३ पासून राजहंस प्रकाशनमध्ये राजहंस ग्रंथवेध या गृहपत्रिकेच्या कार्यकारी संपादक

पुरस्कार 

ज्ञात – अज्ञात अहिल्याबाई होळकर या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार

 • महाराष्ट्र साहित्य परिषद – श. म. भालेराव पुरस्कार २००८
 • उत्कर्ष मंडळ, विलेपार्ले (पूर्व) मुंबई – ग्रंथगौरव पुरस्कार २००८
 • भैरुरतन दमाणी पुरस्कार – सोलापूर २००८
 • महाराष्ट्र शासन – लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २००८
 • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर मुंबई – वि. ह. कुलकर्णी पुरस्कार २०१०
 • विद्यार्थी साहाय्यक संस्था, गिरगाव मुंबई – जानकीबाई मुळे आणि गोपाळ कुळकर्णी पुरस्कार २०१०