तर वादळच उगवेल !, वावटळ पेराल
₹260
Offer Price: ₹234
प्राचीन काळात व्यापारी उद्देशाने
सौदागरांचे तांडे देशीविदेशीचा
भूगोल पालथा घालत. या तांड्यांबरोबर
नट, नर्तक, वैदू, हेर, चोर असे घटकही सोबत जात.
क्वचित परक्या भूगोलावर गुन्हेगारी धुडगूस घालत.
आजचे भूराजकारण असेच काहीसे आहे.
पृथ्वीवरील खनिजसंपत्ती आणि ती वाहून नेण्याचे व्यापारी मार्ग
हे फक्त युरोप-अमेरिकेच्या ताब्यात हवेत,
ही आजची अटीतटी मोठी आहे.
त्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि
शस्त्रलॉबी हातात हात घालून काम करतात.
व्यापारी मार्गांवरील देशांना मांडलिक बनवण्याच्या नादात
युद्धाचे वणवे पेटवून देतात.
मध्यपूर्वेतील अशा युद्धकहाराची ही गोष्ट!
in stock
mangala.pandu (verified owner) –
इतक्या महत्वाच्या विषयावरचे पुस्तक मराठीत आणल्या बद्दल आपले अभिनंदन.
प्रत्येक प्रकरणा आधी तुम्ही दिलेली पाश्वभूमी विषय समजायला खुपच मदत करते.
अनुवाद इतका सुरेख झाला आहे की हे पुस्तक मराठी मातीतुनच उगवल्या सारखे वाटते.
हा ग्रंथ सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या अनेक घटनांकडे अधिक व्यापक द्रुष्टीने पाहायला शिकवताे आहे.
“प्रसारमाध्यमांच्या हाती आणि राजकारण्यांच्या हाती आपल्या देशाचे भविष्य साेपवू नका. कारण हे दाेन्ही महाभाग प्रांतिक विचारांत आणि संकुचित स्वार्थात बरबटलेले आहेत. आपल्या पैकी प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या भविष्यासंबंधी, आपल्या प्रुथ्वीच्या रक्षणासंबंधीचे निर्णय आपल्या हातात ठेवणे महत्त्वाचे आहे”
– हे स्काेपाेस आपल्याला निश्चितच लागू पडते.