सुबोध बायबल (नवा व जुना करार)

1,200
Offer Price: 1,080

जगात या ग्रंथाच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात…
‘ऑल टाइम बेस्टसेलर’ म्हणून ओळखला जाणारा हा ग्रंथ!
जगात या ग्रंथाचा हजाराहून अधिक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे;
आपल्या भारतातच तब्बल दोनशे बोलीभाषांमध्ये या ग्रंथाचा अनुवाद उपलब्ध आहे…
महात्मा गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, साधू सुंदरसिंग, मदर तेरेसा,
विनोबा भावे, अल्बर्ट श्वाइट्झर… या आणि यांच्यासारख्या असंख्य लोकांनी
या ग्रंथातून प्रेरणा घेतली, असे इतिहास सांगतो.

हे सारे खरे असले, तरीदेखील सर्वसामान्य मराठी वाचकांना बायबलची
पुरेशी माहिती असत नाही. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ किंवा येशूचे चरित्र
एवढीच जुजबी ओळख असते. अनेकांना नवा करार (न्यू टेस्टमेंट)
ऐकून माहीत असतो, काहीजणांना चार गॉस्पेल्स म्हणजेच संपूर्ण बायबल वाटत असते.
जुना करार (ओल्ड टेस्टमेंट) आणि नवा करार (न्यू टेस्टॅमेंट)
मिळून होणारा बायबल म्हणजे एकच एक ग्रंथ नसून
अनेक पुस्तकांचा संग्रह आहे, हे बहुतेकांना ठाऊक नसते.
जिज्ञासेपोटी वाचू इच्छिणा-यांना अपरिचित धार्मिक परिभाषेचा
आणि परकीय सांस्कृतिक वर्णनांचा अडसर
हमखास कंटाळा आणणारा ठरतो.
क्वचितप्रसंगी समज-गैरसमजांना वाव मिळतो.

वास्तवाची ही दोन टोके लक्षात घेऊन
सांस्कृतिक सेतू उभारण्याचा अभिनव प्रयत्न म्हणजे
बायबलची ही नवी आवृत्ती…
जुना आणि नवा दोन्ही करार पूर्णार्थाने सामावून घेणारी…
आधुनिक ललितरम्य शैलीत भावानुवादाच्या रूपात अवतरणारी…
जाणकार लेखकाने व्यासंगी अभ्यासकाच्या भूमिकेतून लिहिलेल्या
तपशीलवार, विस्तृत टिपांमुळे ख-या अर्थाने सुबोध ठरणारी…
नामांकित चित्रकारांच्या असंख्य चित्रांमुळे संग्राह्य झालेली…
मराठीतील धार्मिक साहित्याच्या दालनात लक्षणीय भर घालणारी…!
बायबलची नवी आवृत्ती!

Out of Stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-03-2010 Category:

Additional information

ISBN

978-81-7434-499-1

पुस्तकाची पाने

1210

बाईंडिंग

हार्ड बाऊन्ड

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2010

पहिली आवृत्ती

जून 2010

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Subhodh Bibal -Nava Ani Juna Karar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.