सिद्धार्थ

(2 customer reviews)

160
Offer Price: 144

हा प्रवास आहे
सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा.
हा प्रवास सुखकर नक्की नव्हता.
त्यात आशानिराशेचा लपंडाव होता,
सुखदु:खाची पाठशिवणी होती,
उव्दिग्नतेची खोल खाई अन्
अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती !

‘जिगसॉ पझल’च्या खेळातून
स्वत:चा शोध घेतलेल्या अन्
स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची
आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या
त्याच्या आईबाबांची – स्मिता आणि भूषणची कहाणी…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 190 g
ISBN

978-93-86628-74-9

पुस्तकाची पाने

128

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2019

पहिली आवृत्ती

मे 2019

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

2 reviews for Siddharth

 1. स्मिता बापट जोशी

  विवेक बापट.
  स्मिता, भूषण आणि सिद्धार्थ तुमचे सर्वांचे अभिनंदन. कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि नीटनेटका झाला. रेणू गावस्कर यांचे भाषण तर अप्रतिम. खूप दिवसांनी इतके चांगले भाषण ऐकायचा योग आला….

  २. Leena: Smita- Bhushan and Siddharth. I have always admired you the strength you have showed. I know the journey like yours is never easy, comes with newer and newer challenges. There are still many many pieces in your lives and I am sure there will be many more beautiful pictures hidden in those pieces. May all of you enjoy these pictures….

  ३.स्मिता,

  आत्ताच तुझ पुस्तक वाचून झालं.

  फारच छान लिहिलं आहेस…

  तुझं पाहिलंच पुस्तक आहे असं आजीबात वाटत नाही….

  शेवट पण सुंदर केला आहेस…..

  अशीच लिहिती हो…

  हार्दिक अभिनंदन…….

  👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
  सुनील सहस्रबुद्धे.

  ४.Good evening! आज पुस्तक वाचून झाले.‍‌ खूप अवघड, अप्रतिम , अतुलनीय, अविश्वसनीय आणि अनमोल असे लिखाण केले आहे. अभिमान वाटतोय तुमचा, आणि तुम्ही आजवर केलेल्या सर्व प्रकारच्या मेहनतीचा. केवळ तुमचेच हात देवाला सक्षम वाटले असतील सिद्धार्थ साठी म्हणून तो तुमच्या आयुष्यात आला असावा असे वाटते. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला पुढील लिखाणासाठी आणि खूप आशिष सिद्धार्थ साठी…!
  वृशाली क्षिरे

  ५.Neeta Mahadik: Book khup Chhan. Realy Inspiring. 👍👍 You have lot to tell still more. You should write real, short & inspiring stories. Best wishes 👍👍

  ६.
  ७.
  Yamini IIM: Ratri ek paryant aamhi pustak vachat hoto…ur story is really insporational for me..
  Yamini IIM: Me Siddharth la ajun bhetale nahiye…mala tyala bhetaychay😊
  ८.कऱ्हाडे मावशी
  तुझे पुस्तक आज वाचायला घेतले, बाजूला ठेववतच नव्हते ग !!
  धन्य आहे तुझी !!!!
  अर्थात भूषण ,सतत तुझ्या पाठीशी आहेच.
  पुस्तकाचा शेवट करताना , तू लिहिले आहेस, ते शंभर टक्के सत्य आहे.
  दोन्ही स्मिता, जिंकल्या आहेत.
  वाचताना सतत डोळे पाणावत होते.
  सिध्दार्थला त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व भरभरून आशिर्वाद.
  त्याचप्रमाणे, तुला व भूषणलाही अनेक शुभेच्छा व भरभरून आशिर्वाद.विवेक बापट.

  त्याचप्रमाणे, तुला व भूषणलाही अनेक शुभेच्छा व भरभरून आशिर्वाद.

 2. KISHOR PATIL

  #राजेश्वरी_किशोर

  #पुस्तक_परिचय_सिद्धार्थ

  काल खूप वर्षांनी असे झाले असेल की एक पुस्तक हातात घेतले आणि ते संपेपर्यंत सोडलेच नाही.

  आयुष्याचं ‘जिगसॉ पझल’ सोडवणारा “सिद्धार्थ” लेखिका – स्मिता बापट-जोशी.
  राजहंस प्रकाशन

  स्मिता ताईने आपल्या नाजुक राजकुमाराची जीवन कहाणी मांडत असतांना त्यात त्यांचे परिश्रम आणि सिद्धार्थचा आयुष्यातील संघर्ष खूप उत्कटपणे मांडला आहे.

  एक मूल सांभाळणे, त्याला शिकवणे, त्याचे आयुष्य घडवणे या सर्वच गोष्टी किती चिकाटीने आणि संयमाने कराव्या लागतात याचा अनुभव सगळ्यांना असतोच पण ते मूल जर जन्मतःच एखादा आजार, व्यंग, शारीरिक कमी घेऊन जन्मले तर त्यासाठी लागणारा सोशीकपणा जरा जास्तच वाढतो, नव्हे तो वाढवावाच लागतो. त्याचे आयुष्यच पत्त्यांच्या बंगल्यासारखे असते.. हळुवारपणे एकेक मजला चढवत जायचा असतो.. क्षणिक येणारी वार्‍याची झुळूक देखील त्याला कोलमडायला पुरेशी असते.. मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते.

  असाच काहीसा संघर्ष दिसतो स्मिता ताई आणि सिद्धार्थच्या आयुष्यात. विशेष मूल जन्माला येते त्यानंतर त्याच्यातले विशेषत्व ओळखून त्यात त्याला प्रोत्साहन देऊन प्रवीण करणे म्हणजे एक दिव्यच असते. सिद्धार्थची नजर आणि मन तुटलेले तुकडे जोडण्यात किती तल्लख आहे हे जाणवल्यावर स्मिता ताईंनी त्याला किती प्रोत्साहन दिले.. टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवली.. सोबतच त्याच्या आजारावर उपचार आणि काळजी किती मनापासून घेतली.. त्यात किती अडचणी आल्या.. कधी खचायला झाले तर कधी काही प्रसंगांनी ऊर्जा मिळाली.. सगळं सगळं हे पुस्तक वाचत असतांना मला जाणवले. अडचणींवर मात करून मुलाला स्वतःच्या पायावर उभे केले. स्वतःच्या आयुष्याचे ‘जिगसॉ पझल’ सोडवता सोडवता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये देखील सिद्धार्थ विक्रमवीर ठरला.

  खूप अश्या मातांना हे पुस्तक वाचून मनामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी लागणारे उर्जास्त्रोत मिळतील यात शंकाच नाही..

  समोर एखादे विशेष मूल दिसले की, त्याने जगण्यासाठी किती धडपड केली असेल असा विचार सगळ्यांनीच क्षणभर तरी करावा. यातूनच जनजागृती होण्यास मदत होईल ज्याची अजूनही खूप गरज आहे..

  राजेश्वरी
  १७/०८/२०१९

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.