शुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)
₹175
Offer Price: ₹158
कलेचा प्रवास धुंद करणारा असतो.
यश, कीर्ती, मान-सन्मान ही या प्रवासातली
रमणीय विश्रामस्थळं असतील. परंतु प्रतिभेचा
धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं
मंथन करण्यातच मग्न असतात.
‘शुभ्र काही जीवघेणे’ शोधत असतात.
आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य,
नाटय, संगीत अन् सिनेमाचा परिसर उजळून
काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्त्वं या
पुस्तकाला रेलून उभी आहेत.
प्रत्येकाचं जगणं भिन्न. प्रत्येकाच्या
आयुष्यातल्या हालचाली अगदी वेगळयाच.
ईर्ष्या, वासना अन् प्रेरणांची गुंतागुंत अनोखी.
प्रत्येकजण म्हणजे एक स्वायत्त कलाकृतीच.
परंतु प्रतिभेच्या वरदानाने आणि नितांत
अस्वास्थ्याने सगळेच भारून गेलेले.
‘लस्ट फॉर लाईफ’ने निथळत राहिले.
‘जीवातळी आंथरितू आपुला जीवू’ या
आंतरिक प्रेरणेने सळसळत राहिले.
यापैकी काहींना यशाने वरलं. काहींना नशीबाने
हुलकावण्या दिल्या. तर काही मानभंग होऊन
आडवळणाच्या शेवटाला विव्हळत राहिले.
परंतु आयुष्यातल्या या चढ-उतारांमुळे यापैकी
कुणाचीच प्रतिभा म्लान झाली नाही,
जगण्याची रग ओसरली नाही.
in stock
Reviews
There are no reviews yet.