दरवळे इथे सुवास

200
Offer Price: 180

जगातलं सगळं विज्ञान, कला अन् शास्त्रं
अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात.
शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच.
हे पुस्तक माणसांचं आहे.
तऱ्हेवाईक, प्रामाणिक माणसं.
मानी, दिलदार, लहरी…अन् तालेवार, गुणी माणसं.
माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी माणसं.
प्रत्येकाच्या जगण्याला आत्मभानाचा उग्रमधुर सुवास…

माणसं एकाच मापा-आकाराची नसतात. इथंही तशी ती नाहीत.
महात्मा गांधी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई,
विख्यात पत्रकार-संपादक रुसी करंजिया, ‘फिअरलेस’ नादिया,
कथाकार इस्मत चुगताई, गीतकार-कवी शैलेंद्र,
संगीतकार मदनमोहन, सर लॉरेंस ओलिव्हिए-विवियन ली
यांसारखे मनस्वी प्रतिभावान इथं आहेत.

त्याचप्रमाणे काही साधी माणसंदेखील आहेत.
गवताच्या पात्याप्रमाणे लवलवणारी.
अज्ञात, अयाचित, आनंदी अन् अवध्य.

या माणसांचा अंतर्वेध घेताना, त्यांच्या जगण्यातलं
सत्त्व-तत्त्व ‘मनें मौआलें’ वेचताना लेखकाची वृत्ती
तटस्थ अन् संवेदनशील आहे.
लिखाणातला मैत्रीचा सूर सच्चा अन् संथखोल आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-03-2016 Category:

Additional information

Weight 240 g
ISBN

978-81-7434-956-9

पुस्तकाची पाने

176

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2016

पहिली आवृत्ती

एप्रिल 2016

Illustrator

सतीश भावसार

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Darawale Ithe Suwas”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.