So Cool.. Take 2 | सोकुल ..टेक २

So Cool.. Take 2 | सोकुल ..टेक २

सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-ऐकण्याएवढंच ‘वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-23-0
पहिली आवृत्ती - २९ फेब्रुवारी २०२४
मुखपृष्ठ, आतील मांडणी : सतीश भावसार
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'" X ८.५"
बुक कोड - B-07-2024
पृष्ठ संख्या - २२४
वजन - ३०५

M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save
₹ 35 (10%)