अरविंद परांजपे

अरविंद शंकर परांजपे
बीएस्सी, एफसीएमए, एसीएस
  • सार्थ वेल्थ अ‍ॅडव्हायजर्स प्रा. लि. या म्युच्युअल फंड वितरण करणाऱ्या कंपनीचे संचालक.
  • गेली २० वर्षे अर्थसल्लागार म्हणून कार्यरत.
  • मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या गुंतवणूकदार तक्रार निवारण मंचाचे सदस्य.
  • फिलिप्स इंडियामध्ये १० वर्षे मॅनेजमेंट अकौंटंट. नंतर लहान आणि मध्यम कंपन्यांकरता कॉस्ट मॅनेजमेंट सल्लागार.
  • दोन लिस्टेड कंपन्यांचे कंपनी सेक्रेटरी म्हणून आयपीओचे व्यवस्थापन.

प्रकाशित साहित्य :

  • सकाळ, अर्थमंथन, लोकमत, व्यापारी मित्र, लोकसत्ता इ. नियतकालिकांत गुंतवणूक आणि भारतीय अर्थव्यवस्था याविषयी स्फुटलेखन.
  • पुणे आकाशवाणीकरिता ‘अर्थजिज्ञासा’ हे सदर आणि ‘ये रे ये रे पैसा’ ही गुंतवणूकविषयक रंजक संवादांची मालिका.

अन्य उपक्रम

  • `सामान्यांकरता वैयक्तिक अर्थनियोजन’ आणि `वंâपन्यांचे वित्तव्यवस्थापन’ या विषयांवर अनेक व्याख्याने.
  • `दाबके ट्रस्ट’ चे विश्वस्त.
  • ‘कल्पकता कशी वाढवावी’, आणि ‘परिणामकारकतेच्या सवयी’ या विषयांवर कार्यशाळा.
  • शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी ‘कलापिनी’, तळेगाव या संस्थेतर्फे कार्यशाळा आणि व्याख्यानांचे आयोजन.
  • तबलावादक म्हणून देशात आणि परदेशात अनेक कार्यक्रम.
  • सीएस कलामंडळ आणि मॅनेजमेंट अकाउंटंट अभ्यासमंडळ यांचे संयोजन.

वेबसाईट : www.arvindparanjape.in

Showing the single result