Home / Authors / Kumar Ketkar
Kumar Ketkar
Kumar Ketkar

कुमार केतकर (जन्म : ७ जानेवारी १९४६) : हे काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार, पत्रकार, लेखक आणि व्याख्याते आहेत. अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली आहेत.

* दैनिक लोकसत्ताचे निवृत्त प्रमुख संपादक.
* महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते.
* 'डेली ऑब्झर्वर'चे निवासी संपादक.
* इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे.
* संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राचे संपादक होते.

*** प्रकाशित साहित्य
* बदलते विश्व (लेखमाला, प्रेस्टीज प्रकाशन)
* शिलंगणाचं सोनं (म.टा. मध्ये असतांना लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह १९९४ ते १९९८, मेहता प्रकाशन)
* विश्वामित्राचे जग (अनुभव प्रकाशन)
* वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवलाआहे.

*** पुरस्कार
* लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार - पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने.
* पद्मश्री पुरस्कार- (इ.स. २००१)
* राजीव गांधी पुरस्कार
* नवरत्न पुरस्कार
* रत्नदर्पण पुरस्कार
* चिंतामणराव देशमुख पुरस्कार - अर्थविषयक लिखाणाबद्दल.

Kumar Ketkar ह्यांची पुस्तके