Home / Authors / Dr. Prabhakar Kunte | डॉ. प्रभाकर कुंटे
Dr. Prabhakar Kunte | डॉ. प्रभाकर कुंटे
Dr. Prabhakar Kunte | डॉ. प्रभाकर कुंटे

डॉ. प्रभाकर कृष्णाजी कुंटे (जन्म : इ.स. १९३०; - पुणे, ७ ऑगस्ट, इ.स. २०१५ हे एक मराठी खगोल वैज्ञानिक व लेखक होते. टाटा संशोधन संस्थेत ते ३७ वर्षे नोकरी करत होते.

* त्यांच्या ’गुरुत्वाकर्षणीय भिंगा’च्या संशोधनाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. डॉ. कुंटे यांनी कॅनडातल्या कॅलेगरी विद्यापीठात आमंत्रित म्हणून काम केले आहे. ’विज्ञानभारती’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.

* त्यांनी अकरा विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र सरकारने तसेच बालसाहित्य परिषदेने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

*** डॉ. प्रभाकर कुंटे य़ांनी लिहिलेली पुस्तके
* अंतरिक्ष वारकरी
* खग्रास सूर्यग्रहण
* ताऱ्यांचे अंतरंग
* दुर्बिणींचे विश्व’ या कै. सुनील जोगळेकर यांनी १९८९ साली लिहिलेल्या पुस्तकातले ’रेडिओ खगोलशास्त्र' हे अकरावे प्रकरण
* धूमकेतूची स्वारी
* भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. सी. व्ही. रामन (चरित्र)
* मानवाची अंतराळ झेप (वैज्ञानिक)
* व्यंकटेश बापूजी केतकर (चरित्र)

Dr. Prabhakar Kunte | डॉ. प्रभाकर कुंटे ह्यांची पुस्तके