Home / Authors / Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर
Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर
Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर

अभिराम भडकमकर (जन्म : ७ जानेवारी, इ.स. १९६५) हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे हिंदी, कानडी आणि गुजराथी अनुवाद झाले आहेत.

*** अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली मराठी-हिंदी नाटके
* अपलक निद्राहीन (हिंदी)
* आलटून पालटून
* कॉम्रेड का कोट (हिंदी)
* ज्याचा त्याचा प्रश्न
* देहभान
* पाहुणा
* प्रेमपत्र
* याच दिवशी याच वेळी
* लडी नजरिया (हिंदी)
* सवाल अपना अपना (हिंदी)
* सुखांशी भांडतो आम्ही
* स्थळ स्नेहमंदिर
* हसत खेळत

*** एकांकिका
* झाड
* धोबीपछाड
* पाच शून्यांची बेरीज
* ये गं ये गं सरी

*** पुस्तके
* ॲट एनी काॅस्ट (मराठी कादंबरी)
* असा बालगंधर्व (मराठी चरित्रकादंबरी)
* इन्शाअल्लाह (मराठी कादंबरी)
* चुडैल (मराठी कथासंग्रह)

*** अभिराम भडकमकर यांची पटकथा असलेले चित्रपट
* आई
* आम्ही असू लाडके
* एप्रिल फूल
* ए रेनी डे
* कमाल माझ्या बायकोची
* खबरदार
* घायल
* चिकट नवरा
* चेस
* जलसा
* दुर्गे दुर्गट भारी
* देवकी
* नवसाचे पोर
* पछाडलेला
* पाऊलवाट
* फुल थ्री धमाल
* बालगंधर्व
* मन्या सज्जना
* विटीदांडू

*** अभिराम भडकमकर यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट
* आम्ही असू लाडके
* बाबा लगीन
* दिग्दर्शन केलेले माहितीपट
* फिल्म सिटी (मराठी)
* बिहाईंड द स्टेज (हिंदी)

*** अभिराम भडकमकर यांची भूमिका असलेले चित्रपट
* जिंदगी जिंदाबाद (हिंदी)
* देवकी
* पछाडलेला
* पाऊलवाट
* फुल थ्री धमाल
* रामदेव आला रे बाबा
* रिलेशन्स (हिंदी)

*** भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका (दिग्दर्शक)
* आहट (हिंदी, बी.पी सिंग)
* चाणक्य (हिंदी, चंद्रकांत द्विवेदी)
* दामिनी (मराठी, कांचन अधिकारी)
* रास्ते (हिंदी, अलका मैत्र)
* सी.आय.डी (हिंदी, बी.पी सिंग)
* सैलाब (हिंदी, रवि राय)
* क्षितिज (हिंदी, आनंद राय)
* दूरचित्रवाणी मालिका लेखन
* गोपालजी (हिंदी)
* टीचर (हिंदी)
* पुकार
* रास्ते (हिंदी)
* व्ही थ्री प्लस (हिंदी)
* साया (हिंदी)
* क्षितिज (हिंदी)

*** अभिराम भडकमकर यांना मिळालेले पुरस्कार
* सन २०१७चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार
* 'असा बालगंधर्व' या कादंबरीसाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह. ना. आपटे पुरस्कार (२०१२)

Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर ह्यांची पुस्तके