Home / Authors / A. P. Deshpande | अ. पां. देशपांडे
A. P. Deshpande | अ. पां. देशपांडे
A. P. Deshpande | अ. पां. देशपांडे

डाॅ. अनंत पांडुरंग देशपांडे हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके व लेख लिहिणारे लेखक आहेत. २०१८मध्ये ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह झाले.

* अ.पां. देशपांडे हे मुळात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे आणि मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून ३५ वर्षे नोकरी केली.

* देशपांडे हे इ.स. १९७४पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे.

* त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स' ही संस्था १९९७ साली स्थापन केली. ते त्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासूनचे अध्यक्ष आहेत.

*** पुस्तके (लेखन व संपादन)
* विज्ञानयात्री - डॉ अनिल काकोडकर (चरित्र, सहलेखक - डाॅ. श्रीराम मनोहर)
* अभियांत्रिकीचे जग (संपादित)
* आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण (अनेक खंड, प्रत्येक खंडाचे अनेक भाग). : खंड ३ (विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण), भाग १ - शिल्पकार चरित्रकोश (संपादित, सहसंपादक डाॅ बाळ फोंडके)
* उपयोजित विज्ञान (संपादित)
* कॅनडा (प्रवास वर्णन)
* काडेपेटी आणि इतर विज्ञान खेळणी (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता)
* घरगुती वापरातील १३० औषधी वनस्पती (माहितीपर)
* टाकाऊतून शिकाऊ (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता)
* द्रव्यगुण विज्ञान, भाग १, २ (मराठी, इंग्रजी, सहलेखक - डाॅ. सुभाष रानडे, वैद्य रवी रा.जवळगेकर))
* परिसर आणि स्वावलंबन (माहितीपर)
* मराठी विज्ञान परिषद नाबाद ५१ (माहितीपर)
* विज्ञानयात्री - डॉ. माधव गाडगीळ (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* विज्ञानयात्री - डॉ. माधव चितळे (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* मूलभूत विज्ञान (संपादित)
* यंत्रमानव (संपादित कथासंग्रह, सहसंपादक - सुबोध जावडेकर)
* डॉ. रघुनाथ माशेलकर : भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* विज्ञानयात्री - डॉ. वसंत गोवारीकर (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* विद्वज्जन
* विज्ञान व तंत्रज्ञानविषयक प्रगती
* विज्ञानिनी भाग १, २; (संपादित, या संग्रहात एक लेख डाॅ. मेघश्री दळवी यांचा आहे.
* शंभर वनस्पती शास्त्रज्ञ (संपादित)
* शेतीतज्ज्ञ - डॉ. आ. भै. जोशी (चरित्र)
* स्वरयज्ञ - सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची पन्नास वर्षे (संपादित)

*** अ.पां देशपांडे यांनी लिहिलेल्या काही लेखांचे मथळे
* ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक
* भालचंद्र उदगावकर समाजभान असणारा वैज्ञानिक

A. P. Deshpande | अ. पां. देशपांडे ह्यांची पुस्तके