संस्कार भारतीच्यावतीने यावर्षीपासून दिला जाणारा ‘डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती  राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांना जाहीर झाला आहे. येत्या ३ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आयोजित  विदर्भ संस्कार भारतीच्या प्रांत अधिवेशनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. शेषराव मोरे लिखित व राजहंसतर्फे प्रकाशित ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळाला आहे. मानपत्र आणि १५ हजार रुपये रोख,असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.