महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, `राजहंस प्रकाशन’ आणि ढोले कुटुंबीयांतर्फे  दिला जाणारा ‘रेखा ढोले- स्मृतिपुरस्कार २०१९’ वितरण समारंभ दि. २१ एप्रिल २०१९ रोजी पत्रकार भवन येथे संपन्न झाला. या योजनेचे हे पाचवे आणि अखेरचे वर्ष…

सुप्रसिद्ध कवयित्री आणि विचारवंत मा. डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारविजेते श्रीमती करुणा गोखले यांना अनुवादक्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल मानचिन्ह आणि रु.२५,०००/- ; श्रीमती राधिका टिपणीस यांना ‘बालाचा बेडूकमित्र’ आणि इतर पुस्तकांसाठी सर्वोत्कष्ट निर्मितिमूल्ये, मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावट : मानचिन्ह आणि रु.१५,०००/-, ज्योत्स्ना प्रकाशन यांना ‘बालाचा बेडूकमित्र’ आणि इतर पुस्तकांसाठी सर्वोत्कष्ट निर्मितिमूल्ये, मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावट : मानचिन्ह आणि रु.१०,०००/-

याचवेळी ‘भगतसिंगचा खटला’: न्यायाच्या हत्येचे कारस्थान, मूळ लेखक : ए. जी. नूराणी, अनुवाद : रेखा ढोले आणि डॉ. सदानंद बोरसे या पुस्तकाचे मा. डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रेखा ढोले यांची बालमैत्रीण श्रीमती सुषमा निसळ, डॉ. श्रीराम गीत, उद्धव कानडे इ. मान्यवरही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर डावीकडून श्री.उद्धव कानडे, श्री. प्रविण ढोले, श्रीमती सुषमा निसळ, डॉ. अरुणा ढेरे, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. श्रीराम गीत

मा. डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते श्रीमती करुणा गोखले पुरस्कार स्वीकारताना.

मा. डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ज्योत्स्ना प्रकाशनाचे संचालक श्री. मिलिंद परांजपे पुरस्कार स्वीकारताना.

‘भगतसिंगचा खटला’: न्यायाच्या हत्येचे कारस्थान, मूळ लेखक : ए. जी. नूराणी, अनुवाद : रेखा ढोले आणि डॉ. सदानंद बोरसे या पुस्तकाचे मा. डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन