साहित्य संस्थांची आद्य संस्था म्हणून ओ‌ळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ ज्येष्ठ लेखक, संपादक आणि राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांना गुरुवारी जाहीर झाला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. २७ मे रोजी परिषदेच्या ११३ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम नवी पेठेतील निवारा सभागृहात सायंकाळ‌ी ६ वाजता होईल,’ अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली