छापील पुस्तके आणि वाचक ही संस्कृतीची घट्ट वीण गेल्या १०-१५ वर्षांत उसवलेली दिसते. दृक-श्राव्य, इंटरनेट आणि समाजमाध्यमे अशी आधुनिक माध्यमे आली तरी छापीलपुस्तकांचे महत्त्व कमी होणार नाही. ई-बुक आणि ऑडिओ बुक ही नवी माध्यमे मराठी भाषेच्या दारावर टकटक करीत आहेत. नव्या बदलांना सामोरे जात प्रकाशकांनी जगभरातील वाचकांसाठी अक्षर वाङ्मयाचे आधुनिक माध्यमाशी नाते जोडावे, अशी अपेक्षा राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.