पुणे मराठी ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त डॉ. संदीप श्रोत्री  लिखित कासवांचे बेट
या पुस्तकास स्वा. सावरकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. संदीप श्रोत्री  यांचे हार्दिक अभिनंदन
 

कासवांचे बेट

गालापगोस’ म्हणजे कासवांचे बेट.
ही बेटे आहेत सुदूर प्रशांत महासागरामध्ये.
तीस-चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटांतून बनलेली ही बेटे
म्हणजे या वसुंधरेवरील सर्वांत तरुण एकाकी भूमी.
अपघातानेच लाखभर वर्षांपूर्वी या बेटांवर
काही मोजक्या सजीवांचा चंचुप्रवेश झाला.
या अतिसंवेदनशील अधिवासामध्ये काही टिकले, काही संपले.
मोजक्याच वनस्पती, मूठभर पशु-पक्षी.
त्यांच्या जीवनसाखळ्या अगदीच प्राथमिक,
संशोधकांसाठी जणू बाळबोध लिपीच.
पहिल्यांदा ती वाचली सर चार्ल्स डार्विन यांनी,
तोच उत्क्रांतिवादाचा जन्म.

आजही माणूस तेथे पाहुणाच आहे,
आणि पाहुण्याने पाहुण्यासारखेच राहायला हवे, नाही का?
त्यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.