ISBN No: 
978-81-7434-955-2

डॉ. अरुण जोशी हे एक नामवंत पशुवैद्य.
घरातल्या कुत्र्यामांजरांपासून सर्कशीतल्या हत्तीघोडयांपर्यंत,
गोठयातल्या गायीम्हशींपासून रानावनातल्या वाघसिंहांपर्यंत,
पिंजऱ्यातल्या पोपटमैनेपासून घरटयातल्या गिधाडघुबडापर्यंत,
अजस्र देवमाशापासून खेळकर डॉल्फिनपर्यंत
असंख्य पशुपक्ष्यांच्या सहवासात ते वावरले.
आयुष्यभर अनेक प्राण्यांची काळजी घेणाऱ्या,
देखभाल करणाऱ्या अन् त्यांच्यावर उपचार करणाऱ्या,
या प्राण्यांची स्वभाववैशिष्टये बारकाईने निरखणाऱ्या
खऱ्याखुऱ्या प्राणिसख्याच्या रंजक आठवणी.

पृष्ठसंख्या: 
144
किंमत: 
रु. 160
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
April, 2016
ISBN No: 
978-81-7434-956-9

जगातलं सगळं विज्ञान, कला अन् शास्त्रं
अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात.
शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच.
हे पुस्तक माणसांचं आहे.
तऱ्हेवाईक, प्रामाणिक माणसं.
मानी, दिलदार, लहरी...अन् तालेवार, गुणी माणसं.
माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी माणसं.
प्रत्येकाच्या जगण्याला आत्मभानाचा उग्रमधुर सुवास...

माणसं एकाच मापा-आकाराची नसतात. इथंही तशी ती नाहीत.
महात्मा गांधी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई,
विख्यात पत्रकार-संपादक रुसी करंजिया, 'फिअरलेस' नादिया,
कथाकार इस्मत चुगताई, गीतकार-कवी शैलेंद्र,
संगीतकार मदनमोहन, सर लॉरेंस ओलिव्हिए-विवियन ली
यांसारखे मनस्वी प्रतिभावान इथं आहेत.

त्याचप्रमाणे काही साधी माणसंदेखील आहेत.
गवताच्या पात्याप्रमाणे लवलवणारी.
अज्ञात, अयाचित, आनंदी अन् अवध्य.

या माणसांचा अंतर्वेध घेताना, त्यांच्या जगण्यातलं
सत्त्व-तत्त्व 'मनें मौआलें' वेचताना लेखकाची वृत्ती
तटस्थ अन् संवेदनशील आहे.
लिखाणातला मैत्रीचा सूर सच्चा अन् संथखोल आहे.

पृष्ठसंख्या: 
176
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
April, 2016
ISBN No: 
978-81-7434-954-5

जगणं इतकं परावलंबी की,
जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच !
औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले.
जगणं कसलं ? हे तर
वेदना सहन करत मरण लांबवणं.
अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा
माणसाला अधिकार हवा.
आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच
आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान.

धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या
गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न
तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे
जगायचीही सक्ती आहे...

पृष्ठसंख्या: 
208
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
April, 2016
ISBN No: 
978-81-7434-950-7

माहिती अधिकार कायदा म्हणजे
सरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी
सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे.
पण ते प्रभावी ठरवण्यासाठी
अंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी.

आपण या कायद्यानुसार -
कोणकोणती माहिती मागू शकतो ?
अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ?
तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ?

यांसारख्या प्रश्नांपासून ...

शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ?
विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ?
एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ?
हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ?
शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ?

यांसारख्या प्रश्नांपर्यंत ...
असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक !

सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत
सर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक ...

पृष्ठसंख्या: 
120
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
February, 2016
ISBN No: 
978-81-7434-951-4

आपली सध्याची भेसळयुक्त भाषा....
आपली सध्याची माध्यमग्रस्तता......
आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था......
आपली सध्याची पालकनीती (?)....
आपली सध्याची डगमगणारी......इ.इ.

थोडक्यात,
तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा
तिरकस पण हसरा कटाक्ष..
विचारगर्भ पण मिस्कील भाष्य...
आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं
म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन !

गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न,
नर्मविनोदी आणि 'झुळूकदार' विनोदानं
हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या
मंगला गोडबोले यांच्या
निवडक विनोदी लेखनाचा संग्रह......

पृष्ठसंख्या: 
308
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
April, 2016
ISBN No: 
978-81-7434-893-7
अनुवाद: 
सुलक्षणा महाजन
पृष्ठसंख्या: 
270
किंमत: 
रु. 1500
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
August, 2015
ISBN No: 
978-81-7434-893-7

भारतीय लोकजीवनाच्या अविभाज्य भाग असणारी गंगा नदी.
तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव,
तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता,
तिचे अर्थकरण आणि शुद्धीकरण... या सा-या पैलूंचा
लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध.

पृष्ठसंख्या: 
296
किंमत: 
रु. 600
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
July, 2015
ISBN No: 
978-81-7434-903-3

सळसळतं तारुण्य हा प्रत्येकाच्या
जीवनातला हवाहवासा टप्पा.
उद्याची स्वप्नं पाहण्याचं, मैत्री-प्रेम-सहवासात डुंबण्याचं,
मुक्त जगण्याचं हेच वय.

या टप्प्यावर जीवनाला भावी दिशा देणारे
रस्ते जसे भेटतात,
तशीच आयुष्याचा कडेलोट करणारी
धोक्याची वळणंसुद्धा!

या निसरडया टप्प्यावर तरुणाईनं
आपला ताल आणि तोल कसा सांभाळावा,
तारुण्याचे कल्लोळ कसे सावरावेत,
याचं एका अनुभवी तज्ज्ञानं केलेलं
मोलाचं मैत्रीपूर्ण मार्गदर्शन.

पृष्ठसंख्या: 
182
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
October, 2015
ISBN No: 
978-81-7434-345-1

हे पुस्तक कोणासाठी
सामान्यांसाठी आणि अधिका-यांसाठीही.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)
आणि
राजहंस प्रकाशन
यांचा संयुक्त उपक्रम

पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 160
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
October, 2012
ISBN No: 
978-81-7434-693-3

बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा.
लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं,
उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं,
एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं.

पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी
यांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली,
सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको..
अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी-
कशा बरं लक्षात ठेवायच्या?

पहिल्यांदाच पट हातात घेतलेल्या तसंच
नियमित खेळणा-या खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरेल
असं हे पुस्तक.
बुद्धिबळाचा इतिहास सांगणारं, चाली शिकवणारं,
कोडी घालणारं आणि स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करून घेणारं

पृष्ठसंख्या: 
126
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
March, 2014