ISBN No: 
978-81-7434-962-0

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या.
अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची.
माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती.
त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली.
जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश !
काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही !
बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची,
पंखांत बळ निर्माण करण्याची,
लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि
अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते.

माझ्यासारख्या तळागाळातल्या,
कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या
अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं
कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या
अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी
मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

पृष्ठसंख्या: 
224
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
May, 2016
ISBN No: 
978-81-7434-959-0

अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला,
मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि
लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं
सन्मानानं बोलावून घेतलेला
पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर.
इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं
सन्मानित झालेला एकमेव आशियाई.
यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं.
इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली.
ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला.
कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं...
1960चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले,
तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या
वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते.

पृष्ठसंख्या: 
176
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
April, 2016
ISBN No: 
978-81-7434-949-1

सतरा वर्षांचा एक तरुण माय आणि
मायभूमी यांच्यापासून दूर, एका अनोळखी
जगात जातो, तेव्हा त्याच्या शिदोरीमध्ये
बांधलेली असते अपार जिज्ञासा आणि
अथक ध्यासवृत्ती !
आणि मग सुरू होते ज्ञानपंढरीकडे जाणारी
त्याची वाटचाल... विश्वाची पायाभरणी
करणा-या मूलकणांची रहस्यं उलगडणारी,
जणू विधात्याच्याच मनाचा वेध घेणारी
अशी वाटचाल !
अशी वैज्ञानिक वाटचाल करत राहणारा
डॉ. आशुतोष कोतवाल यानं
आपल्या उपजत प्रज्ञेला दृढसंकल्पाची,
चिकाटीची, परिश्रमांची आणि मनोधैर्याची
जोड दिली. मूलकण-विज्ञान-क्षेत्रातलं
आजचं त्याचं अग्रगण्य स्थान
हे जलपृष्ठावर दिसणा-या हिमशिळेच्या
टोकासारखं आहे.
त्याच्या यशामागं दडलेली आव्हानं,
संघर्ष आणि अविचल आशादृष्टी यांची
ही त्याच्या आईनंच सांगितलेली कथा
अनेक युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल.

पृष्ठसंख्या: 
310
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
February, 2016
ISBN No: 
978-81-7434-946-0

ही आहे एक छान जुळलेली सुरेल मैफल.
क्वचित कुणाच्या वाट्याला येणारी
जन्मजात समृद्धी त्यांना लाभली,
पण ते उतले-मातले नाहीत.
नेकीने उद्योग सांभाळत, त्यांनी समृद्धीचे चीज केले.
कापड उद्योगाच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या
त्यांच्या जीवनात रंग भरला क्रिकेटने.
हौस म्हणून ते खेळाच्या प्रांगणात उतरले,
पण मग हा क्रिकेटचा खेळच त्यांचा ध्यास बनला.
संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी
छान जुळून आलेली जीवनमैफील
दैवायत्तम्

पृष्ठसंख्या: 
296
किंमत: 
रु. 325
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
February, 2016
ISBN No: 
978-81-7434-940-8

हे एका अवलियाचं चरित्र आहे.
मध्य प्रदेशात स्थायिक झालेल्या
कोकणी कुटुंबात जन्मलेला एक पोरगा...
शिक्षणानिमित्त मुंबई, लंडन, हार्वर्ड अशी शहरं फिरलेला विद्यार्थी...
गूढ प्रमेयं सोडवण्यात आनंद मानणारा एक कल्पक गणिती...
पर्डूसारख्या जागतिक ख्यातीच्या विद्यापीठात नावारूपाला आलेला,
एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक...

मराठीवरचं प्रेम परदेशांतही कायम ठेवणारा एक भाषाभिमानी...
जनसामान्यांत गणिताबद्दलची आस्था वाढीस लागावी, म्हणून
पुण्यात 'भास्कराचार्य प्रतिष्ठान'ची स्थापना करणारा एक संशोधक...

रशियन गणितसंशोधकांना ज्याच्याभोवती 'योगिक तेजोवलय' दिसलं,
असा भारतीय योगशास्त्राचा एक गाढा अभ्यासक...

अशा विविध रूपांत वावरलेल्या
'डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर' नावाच्या
एका जगप्रसिध्द मराठी अवलियाचं हे आगळंवेगळं चरित्र.

पृष्ठसंख्या: 
240
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
January, 2016
ISBN No: 
978-81-7434-911-8

काही स्त्रिया सावलीसारख्या जगतात,
तर काही स्वयंप्रकाशी.

सावल्यांच्या वाटयाला नेहमी सन्मानच येतो, असे नाही.
कधी उपेक्षा, कधी गैरसमज, कधी 'झांटिपी'चा शिक्का
असेही पदरात पडते.

तर स्वयंप्रकाशी ज्योतींनाही तेजाबरोबर दाहकता,
नवी वाट दाखवणा-या प्रकाशासवे
विरोधाची अन् टीकेची काजळी सोसावी लागते.

समर्पित, प्रेरणादायी जीवन आणि कर्तृत्वाने
काळाच्या ओघावर ठळक ठसा उमटवणा-या
वेचक स्त्रियांच्या चरितकथा
छाया आणि ज्योती

पृष्ठसंख्या: 
252
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
December, 2015
ISBN No: 
978-81-7434-938-5

“ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.
देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.
हा सर्वसामान्य भारतीय माणूस
भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा
खूपच शहाणा आणि समजूतदार आहे.
योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत
जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं.
हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे.
त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे.
सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा
मी आपल्या साडेपाच दशकांच्या
सार्वजनिक जीवनात काम करताना
वारंवार अनुभव घेतला आहे.
या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला,
यापेक्षा अधिक काय असू शकतं?”
शरद पवार

गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत
महत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेला
आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.

पृष्ठसंख्या: 
370
किंमत: 
रु. 380
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
December, 2015
ISBN No: 
978-81-7434-933-0

१४ फेब्रुवारी २०१५ रोजी, रत्नाकर मतकरी यांच्या साहित्य-कारकिर्दीला
६० वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत, त्यांनी 'गूढकथा' हा वैशिष्टयपूर्ण
कथाप्रकार मराठी साहित्यात रुजवला; त्याशिवाय, कादंब-या, ललित
लेखसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, बालकथा, बालगीते, असे नाना प्रकारचे
दर्जेदार आणि वाचकप्रिय लिखाणही केले. मात्र या लेखनप्रपंचासोबतच
त्यांनी मुलांसाठी व प्रौढांसाठी जी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके
(७५च्या आसपास) लिहिली, ते त्यांचे, मराठी साहित्याला आणि
रंगभूमीला, भरभक्कम योगदान म्हणावे लागेल! विविध विषयांवरच्या,
भिन्नभिन्न शैलीतील, विचारसंपन्न आणि रंगतदार, अशा या नाटकांच्या लेखनाबरोबरच मतकरींनी दिग्दर्शन, नेपथ्य-रंगभूषा-वेषभूषा इत्यादींचे
संकल्पन, अभिनय, निर्मिती अशा रंगभूमीच्या सर्वच शाखांमधून संचार
केला. या दीर्घ रंगप्रवासात त्यांनी नाटयक्षेत्रातील समस्यांचा, आणि
त्याहीपेक्षा सखोल अशा, रंगभूमीच्या मूलभूत प्रश्नांचा सातत्याने विचार
केला. त्या संदर्भातील त्यांचे सविस्तर विश्लेषण, हा 'माझे रंगप्रयोग'चा
गाभा आहे. रंगभूमीच्या वाढीसाठी अपरिहार्यपणे कराव्याशा वाटलेल्या
प्रयोगांचे हे तपशीलवार सत्यकथन, लेखकाच्या ओघवत्या नाटयपूर्ण
शैलीमुळे एखाद्या कादंबरीसारखे वाचनीय झालेले आहे. अनेक छायाचित्रांनी
परिपूर्ण असे हे पुस्तक रंगभूमीच्या अभ्यासकाप्रमाणेच, सर्वसामान्य
रसिकालाही, संग्रही ठेवावे, असेच वाटेल! - इट्स अ कलेक्टर्स आयटेम !

पृष्ठसंख्या: 
720
किंमत: 
रु. 800
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
November, 2015
ISBN No: 
978-81-7434-935-4

विनायक पांडुरंग करमरकर.
कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा
सातत्यानं उत्कृष्ट आविष्कार!
त्यांच्या १९२८मधील
पुण्याच्या पहिल्या शिवस्मारकानं
इतिहास घडवला. त्यानंतर
करमरकरांनी भारतीय
स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात आणि
स्वानंदासाठी केलेल्या शिल्पांनी
मापदंडच निर्माण केला.
दिमाखात जगलेल्या या
शिल्पकाराचं जीवन म्हणजे
'कला व व्यवहार यांचा मेळ
आणि कोरणी व लेखणीचा
अपूर्व संगम!'

पृष्ठसंख्या: 
324
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
October, 2015
ISBN No: 
978-81-7434-904-0

ज्यांना आपण श्रध्दांजली वाहतो, त्या
व्यक्ती केवळ सर्वगुणसंपन्न होत्या,
असा आदर्श मागे झाला नाही, पुढे
होणं शक्य नाही - अशासारखं लिहिणं
शक्य आहे; पण मला ही केवळ
व्यक्तिपूजा वाटते... कदाचित ऐन
तिशीमध्ये मी तसं लिहू शकलो असतो
किंवा तशा प्रकारचं लिहिलंही असेल.
आता या वयाला केवळ भावप्रचुर
लिहिणं मानवत नाही आणि उपयुक्तही
वाटत नाही. काहीतरी पूर्णांशानं खरं
असलेलं आपण लिहू या, त्यामध्ये
कार्याची हानी होणार नाही अशी
अवश्य काळजी घेऊ या. पण तरीसुध्दा
शक्य तितकं यथातथ्य लिहू या,
केवळ भावनाप्रधान लिहायला नको,
असं मला वाटतं.
- आप्पा पेंडसे (एका पत्रातून)

पृष्ठसंख्या: 
296
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
August, 2015