आदिम काळापासून आजवर चालत आलेल्या ओझोनच्या सावलीतल्या मानवी अस्तित्वाचा शोध हा काव्यसंग्रह घेतो.

परंतु या शोधाला काळाचा संदर्भ आहे. अमूर्त काळापासून ते आजच्या वैज्ञानिक युगापर्यंतची काळाची निरनिराळी रूपं या कविता दाखवतात. त्यामुळेच जागतिकीकरणाच्या संदर्भातल्या समकालीन जगण्याचा, त्यातल्या अनेकविध प्रश्नांचा, अंतर्विरोधाचा शोधही त्या आपसूक घेतात. आणि म्हणूनच स्पर्धा, त्यातला रितेपणा, आधुनिक माणसाची अमर्याद भोगलालसा, त्याची प्रवाहपतितताही अपरिहार्यपणे व्यक्त होतेच. आणि विशेष म्हणजे, प्रेम आणि निसर्ग हे अनुभवही या कवितेचे आस्थाविषय आहेत.

पृष्ठसंख्या: 
78
किंमत: 
रु. 60

पॅराप्लेजियानं कायमच्या अपंग झालेल्या सोनाली नवांगुळ या तरुणीचा या कवितासंग्रहाबद्दलचा हा बोलका अभिप्राय-

’ ’नेमानं पाय टाकले मोरासारखे, की जगण्याला कशी ऐट येते पोरा’ - या ओळींवरून पुस्तक उघडताचक्षणी नजर फिरली आणि मनाच्या नितळ काचेवर जमलेली निराशेची वाफ जादूसारखी नाहीशी झाली. त्या कवितेनं माझ्याशी हितगूज केलं. थोडी दटावणी, थोडी माया, थोडं चुचकारणं यातून सैरभैर मन ताळ्यावर आलं. खरंच तुमची कविता फार चांगली आहे!
या कविता एकापाठी एक अशा झटझट वाचता आल्या नाहीत, कारण प्रत्येक नव्या अनुभवाला त्यांच्यामार्फत भिडताना थांबावंच लागलं. हट्टी, बेजबाबदार, निर्ढावलेल्या मनाला या कविता चिंतनासाठी प्रवृत्त करून माणूसपणाचं भान आणतात. तुम्ही न भेटता तुमची कविता आमच्यासाठी हे असं करते, ही खूप मोठी गोष्ट आहे.

तेव्हा मनोजदादा- लिहीत रहा... बळ देत रहा.... ते हवंय... खूप हवंय...’

पृष्ठसंख्या: 
93
किंमत: 
रु. 75

हा कवी सह्याद्रीच्या कुशीत जन्मला.

अठराविश्वे दारिद्र्यात वाढला.
रोजगार हमीवर काम करता करता त्यानं अन्याय पाहिला.
पण त्यामुळेच निसर्गाचा झंकार आणि हृदय पिळवटून
टाकण्याची शक्ती घेऊन कविता लिहायला लागला.
तुकारामाची कविता अंधार दूर करण्यासाठी आपल्याकडून
शक्य होईल तेवढा उजेड पाडत वितळून जाणार्‍या पणतीसारखी आहे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
87
किंमत: 
रु. 175
ISBN No: 
978-81-7434-424-3

कविता हा एक सूक्ष्म जाणिवांच्या तीव्रतर अभिव्यक्तीचा प्रकार आहे.
कवितांच्या मुळाशी अस्वस्थ करणारी संवेदनशीलता असावी लागते.
शिवाय आनंदोत्सवात बुडून जाणारी अनावर इंद्रियजन्यताही लागते. तिची
उपज अनुभवातच असते. नेमकी, संक्षिप्त, सूचक, अमूर्त, अनेकार्थी भाषा
कवितेला लक्षणीय रूप देते. कविता महाजन यांच्या ‘मृगजळीचा मासा’ या
संग्रहातील कविता अस्सल कवितेच्या सगळ्या प्राथमिक अटी पूर्ण
करण्यात बव्हंशी यशस्वी होतात. त्यांचा भावनावेग प्रचंड वेगानं भाषेचा
हिमखंड खेचून आणतो. आणि वाचकांना एकाचवेळी लाव्हारसाचा
आंतरिक दाह नि रक्त गोठवणारी हिमसर्दता अनुभवायला लावतो. त्यांची
कविता स्त्रीवादाच्या सांकेतिक अभिव्यक्तीला उद्ध्वस्त करते आणि
वाचकांना विचारशील बनवते. शिवाय कवितांतल्या उत्स्फूर्त बोधनाच्या,
अंतर्ज्ञानाच्या जागाही दाखवते. निव्वळ भावावेगात अडकून न पडता ती
बुध्दीकडे प्रवास करते आणि वाचकांनाही या प्रवासाची सक्ती करते. यात
सौंदर्याचा तोल ढळू न देण्याची काळजी घेते. विचार हरवत चाललेल्या
आणि प्रतिक्रियांवरच आयुष्य घालवणा-या आपल्या सद्य:कालीन खुरटया
समाजात या कविता विलक्षण झेप घेतात, वाचकांची जाण वाढवतात व
वाचकाची आधिभौतिक भूक भागवण्याचाही प्रयत्न करतात. त्यांचा हा
संग्रह प्रौढ, परिपक्व तर आहेच; समकालीन मराठी कवितेत त्यानं आपलं
स्थानही अढळ केलं आहे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09
पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 100
सद्य आवृती: 
August, 2008

’कविता पोटात वाढत असते तेच बरं असतं
ती तेव्हा आपली असते अन् तेच खरं असतं.
कविता जन्माला आली
की सापडते माणसांच्या तावडीत
अन् माणसाळते...’
एकीकडे हे सांगत असतानाच अंबरीश मिश्रांमधला कवी,
’कागदाच्या होड्यांनाही
अक्षरांची अपूर्वाई
र्‍हस्वदीर्घाच्या मिठीत
नात्यातली हिरवाई’
याची दखल घेत काव्यसंग्रहाला जन्म देत असतो.

पृष्ठसंख्या: 
59
किंमत: 
रु. 50