अनुवादित
ISBN No: 
978-81-7434-960-6

अकिरा कुरोसावासारखा प्रतिभावान दिग्दर्शक,
अनेक पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, जीवशास्त्रज्ञ,
अभ्यासक आणि जगभरचे असंख्य वाचक
या साऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरलेले विलक्षण पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
224
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
April, 2016
ISBN No: 
978-81-7434-947-7
अनुवाद: 
कल्पना वांद्रेकर

'मूर्ख कुठली !'' आजी माझ्यावर खेकसली आणि झटकन तिनं
चिकनची तंगडी माझ्या भावाच्या ताटात वाढली.
''तंगडी नेहमी मुलांसाठी राखून ठेवलेली असते; मुलींनी उरलेले
तुकडे खावेत -'' आजी सांगत होती.

''तिच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायची काही गरज नाही -''
आजी माझ्याच अंघोळीविषयी बोलत होती.
''पण आज गारठा जास्त आहे -'' बानोताई माझी कड घेत होती.
''गारठयाची सवय करायला हवी तिला. गरम पाण्याची सवय
लावून मुलीला बिघडवू नकोस -'' आजीनं बानोला तंबी दिली.

त्या क्षणी मला जाणवलं, की मी मुलगी आहे म्हणून आजीची
नावडती आहे.

लौकिकार्थानं मातृसत्ताक पद्धती असूनही नागा समाजातील
मुलींच्या नशिबी दुस्वासच येतो. छोटया मुलीच्याच कथनातून हे
विशद करणारी, ईस्टरिन किरे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नागा
लेखिकेची कादंबरी आता मराठीत.

'दुस्वास'च्या निमित्तानं नागालँडचं साहित्य
प्रथमच मराठीत येत आहे.

पृष्ठसंख्या: 
280
किंमत: 
रु. 280
प्रथम आवृत्ती: 
2016
सद्य आवृती: 
February, 2016
ISBN No: 
978-81-7434-928-6
अनुवाद: 
सुजाता गोडबोले

गांधी' या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती,
की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाही
भलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत.

गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले,
याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी
करून ठेवले आहे.

चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर...
सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी,
निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद...
अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे.

अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन
गांधी
प्रथम त्यांस पाहता...

पृष्ठसंख्या: 
276
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
October, 2015
ISBN No: 
978-81-7434-916-3
अनुवाद: 
करूणा गोखले

जवाहरलाल नेहरू.
गरीब, अर्धशिक्षित, धर्मपरायण देशाचे
धनाढय, उच्चविद्याविभूषित, निरीश्वरवादी पंतप्रधान.
नेहरू म्हणजे एक विलक्षण रसायन.
आधुनिकतेची आस, परंपरांबद्दल आस्था.
मायभूमीवर निस्सीम प्रेम, इतर राष्ट्रांच्याही भल्याची आच.
भावुक अन् उमदे. कविमनाचे अन् साहित्यिक पिंडाचे.
बुध्दिप्रामाण्यवादी अन् वैज्ञानिक प्रगतीची ओढ असलेले.
अलिप्त राष्ट्रांची चळवळ, पंचशील तत्त्वे, सुनियोजित
विकासप्रकल्प, औद्योगिकीकरणाचा मजबूत पाया
असे भरीव कार्य करणारे नेहरू;
पण त्यांनी काश्मीर-प्रश्न राष्ट्रसंघात नेऊन
देशाला एक भळभळती जखम करून ठेवली.
चीनवर भाबडा विश्वास टाकून देश युध्दाच्या खाईत लोटला.
नेहरूंवर अलोट प्रेम करणारी जनताही त्यांच्या या
चुका नजरेआड करू शकत नाही.
अनेक रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या
या नवभारताच्या शिल्पकाराचे
एम. जे. अकबर लिखित चरित्र आता मराठीत.

पृष्ठसंख्या: 
710
किंमत: 
रु. 600
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
September, 2015
ISBN No: 
978-81-7434-761-9
अनुवाद: 
अभय सदावर्ते

हेडलीचं व्यक्तिमत्व आकर्षक.
वागणं सभ्य अन् सुसंस्कृत.
स्वभाव नम्र, ऋजू, मनमिळाऊ.
स्वत:च्या वडलांकडून
मायेचा ओलावा न मिळालेल्या
राहुलला हेडलीता सहवास म्हणजे
मनाला उभारी देणारं
हक्काचं विश्रांतीस्थान वाटू लागलं.

पण हेडलीच्या चेह-यावरचा हा दिखाऊ
मुखवटा जेव्हा दूर झाला, तेव्हा-

२६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्लाचं
नियोजन करणारा भेसून सैतानी चेहरा
राहुलसमोर आला तेव्हा-

पृष्ठसंख्या: 
254
किंमत: 
रु. 240
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
July, 2014
ISBN No: 
978-81-7434-357-4

'संघर्ष आणि झगडा यांनी भरलेल्या
जगात माझं स्थान काय?''
''दैनंदिन ताणतणावांना कसं सामोरं जाऊ?''
''माझं आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण कसं होऊ शकेल?''
हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि युवक
राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सातत्यानं विचारत असतात.
त्यांना उत्तर म्हणून, हे पुस्तक जीवनाकडे पाहण्याचा
आध्यात्मिक दृष्टीकोन अधोरेखित करतं.
'जागतिकीकरण म्हणजे सुखाचा जल्लोष' आणि 'जग
म्हणजे केवळ संघर्षाची रंगभूमी' या दोन टोकांच्या
युक्तिवादांच्या 'मधला' मानवतावादी मार्ग सुचवणारे,
आत्मपरिक्षणाला उद्युक्त करणारे हे जीवनाच्या
प्रयोजनविषयीचे संवाद!

पृष्ठसंख्या: 
148
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
September, 2011
ISBN No: 
978-81-7434-872-2
अनुवाद: 
माधुरी शानभाग

तरुण मित्र-मैत्रिणींनो,
आपलं करिअर विज्ञान-संशोधनात करायचं ठरवताय?
कोणते मार्ग अनुसराल?
कोणते आनंद अन् निराशा तुमच्या वाटयाला येऊ शकतील?
हे करिअर तुम्ही का निवडायला हवं?
यश मिळवण्यासाठी काय करायला हवं?

'मुंग्या' या विषयावर अत्यंत मूलभूत संशोधन करणारे
जगद्विख्यात शास्त्रज्ञ : डॉ. एडवर्ड ओ. विल्सन
या प्रतिभावान शास्त्रज्ञानं स्वत:च्या जीवनातील घटना,
आगळेवेगळे छंद आणि संशोधनातील अनुभव यांच्या आधारे
मित्राच्या जिव्हाळयानं तरुणाईशी साधलेला संवाद
म्हणजे हे पत्ररूप मार्गदर्शन.

पृष्ठसंख्या: 
194
किंमत: 
रु. 200
सद्य आवृती: 
June, 2015
ISBN No: 
978-81-7434-739-8
अनुवाद: 
शारदा साठे

तो एक आव्हानात्मक कालखंड होता...
परस्परविरोधी तत्त्वप्रणाली अन् द्वंद्वांनी भरलेल्या प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य,
आघाडी सरकार, आक्रमक विरोधी पक्ष
या सगळ्यांनी विस्कळीत झालेला कालखंड...
त्या काळात लोकसभेचे सभापती होते
सोमनाथ चटर्जी.

लोकसभा म्हणजे लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ.
आणि सभापतीपद म्हणजे जणू या लोकसभेचा मानदंडच.
हा मानदंड पेलताना सोमनाथ चटर्जींना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागले.
सदसद्विवेकाच्या कसाला उतरावे लागले.
पक्षांच्या कुंपणांना पार करून
विवेकनिष्ठेला साक्षी ठेवून
घटनेचे श्रेष्ठत्व जपावे लागले.
त्यांच्या काळाचा अन् कर्तृत्वाचा आलेख म्हणजे

पृष्ठसंख्या: 
322
किंमत: 
रु. 325
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
June, 2014
ISBN No: 
978-81-7434-635-3
अनुवाद: 
डॉ.शरद चाफेकर (मूळ लेखक -डोमिनिक लापिए। जाविएर मोरो)

२ डिसेंबर १९८४
भोपाळच्या युनियन कार्बाइड
कारखान्यात स्फोट.
विषारी वायू भोपाळभर पसरला.
हजारो लोक मृत्यूमुखी पडले,
शेकडो लोक अपंग झाले.
या कोलाहलात शेतमजूर ते
पाश्चात्य इंजिनीयर सगळेच भरडले गेले.
हे सारे कसे घडले? का घडले?
डेमिनीक लापिये आणि जाविएर मोरो
या दोघांनी कसून शोध घेतला.
सरकारी अहवाल काय म्हणतात?
वर्तमानपत्रे काय सांगतात?
पीडित माणसे काय बोलतात?
या सर्वांचा आधार घेऊन-
उद्ध्वस्त समाजजीवन, सामाजिक रेटे -
ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ
यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी !

पृष्ठसंख्या: 
292
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
December, 2013
ISBN No: 
978-81-7434-620-9

भारतीय जीवनधर्माचा प्राणस्वर
स्खलनशील माणूस अन्
चिरंतन मूल्ये यांचा संघर्ष
मंगेश पाडगांवकर
कथारूपात सांगत आहेत
तीन हजार वर्षांची
अदभुत रसयात्रा

पृष्ठसंख्या: 
1104
किंमत: 
रु. 600
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
October, 2013