ISBN No: 
978-81-7434-931-6

जगातील सारी राष्ट्रं
'आर्थिक वाढ म्हणजेच विकास'
हा भ्रम उराशी कवटाळून
वेगानं पुढे धावताहेत;
आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण
अशा सर्व स्तरांवर
समस्या निर्माण करत आहेत.

ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं
म्हणजे भूतान आणि क्यूबा.
भूतान GDP पेक्षा GNH ला
अधिक महत्त्व देतो;
तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून
आपल्या विकासनीतीला
एक वेगळंच वळण दिलं आहे.

ह्या दोन राष्ट्रांच्या
'सम्यक् विकासा'च्या दिशेत
चाललेल्या वाटचालीचा
हा परिचय आणि विश्लेषण.

पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 140
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
November, 2015
ISBN No: 
978-81-7434-213-3

एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे
असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर
अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं
सौभाग्य लाभावं लागतं.

पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि
माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका
विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या
या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर
मोहीनी घातलेली आहे.

पृष्ठसंख्या: 
36
किंमत: 
रु. 50
प्रथम आवृत्ती: 
2001
सद्य आवृती: 
May, 2013
ISBN No: 
978-81-7434-205-8

वनस्पती म्हणजे काय, वनस्पतीचं काम कसं चालतं
ते या पुस्तकात सांगितलं आहे.

वनस्पतिशास्त्र शिकवणारी पाठयपुस्तकं असतात.
पाठयपुस्तकात वनस्पतीचे विविध भाग, वनस्पतीची
वाढ, वनस्पतीमधल्या विविध प्रक्रिया इत्यादी गोष्टी
सांगितलेल्या असतात. पाठयपुस्तकातला मजकूर फक्त
विद्यार्थ्यांसाठीच असतो.

झाड आणि माणूस या पुस्तकातला मजकूर वर्गात न
जाता कळणारा आहे. शाळा, फळे, भिंती, मास्तर,
परीक्षा, पास, नापास इत्यादी गुंत्याच्या बाहेर राहून
वनस्पतीशी मैत्री करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.
हे पुस्तक वाचून वनस्पतीची गंमत कळते.

या पुस्तकाची दुसरी गंमत अशी की यातल्या मजकुराला
एक स्वतंत्र शैली आहे. या मजकुरात माणसं आहेत,
प्रसंग आहेत, घटना आहेत, किस्से आहेत आणि
अर्थातच शास्त्राचा आधार असलेली माहिती आहे.
म्हटलं तर ही गोष्ट आहे. म्हटलं तर ही पत्रकारिता
आहे. म्हटलं तर हे शिक्षणही आहे. ज्ञान आहे आणि
गंमतही आहे. कथा, कादंबरी, पत्रकारिता, शिक्षण
इत्यादी हेतूंसाठी तयार केल्या जाणाऱ्या मजकुराचे
साचे ठरलेले आहेत. शैल्या ठरलेल्या आहेत. मजकुरांची
साचेबंद शैली सवयी दूर सारून लेखक वाचकांशी
बोलला आहे.

पृष्ठसंख्या: 
108
किंमत: 
रु. 90
प्रथम आवृत्ती: 
2001
सद्य आवृती: 
August, 2012
ISBN No: 
978-81-7434-337-6

पर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी
झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’
मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली
आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे.

पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील
असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत —
आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव,
आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि
केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे
अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव,
स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे
आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत.

ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या
सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो
कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि
प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची
दिशा शोधणारं हे पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
200
किंमत: 
रु. 180
प्रथम आवृत्ती: 
1986
सद्य आवृती: 
October, 2009
ISBN No: 
978-81-7434-652-0

माणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षं
सुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञान
ह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं.
परंतु, गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून
‘विकासा’चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं. उत्पादन
वाढलं-उपभोग वाढले. कष्ट कमी होऊन जीवन सुखी झालं.

पण दुर्दैवानं ही ‘सुखं’ त्यांच्याहून अधिक ‘दु:खं’च निर्माण
करताहेत! अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरून
निसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय,
एंट्रॉपी वाढतीये.

ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! ‘भांडवली
ऊर्जां’चा वापर टाळून ‘आय ऊर्जां’च्या आधारे संयमितपणे
जगायला लागणं.

प्रचलित ‘विनाश-प्रतिमाना’ची चिकित्सा आणि चिरफाड
करणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैली
ह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ

पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
978-81-7434-660-5

व्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्या
असंख्य समस्यांचा सामना करावा लागत
असूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्य
प्रवाहाबरोबरच वाहत राहतात.
पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारून
त्यातून बाहेर पडणारे, वेगळ्या वाटा
चोखाळणारे असेही अनेक जण आहेत.
त्यांनी आपल्या जीवनाचा वेग, कार्यक्षेत्र
आणि गुंतागुंत कमी करण्याची प्रयत्न
केला आहे.
म्हटलं तर ते चारचौघांसारखंच सामान्य
जीवन जगत आहेत; पण त्या सामान्य-
पणातच एक असामान्यत्व दडलेलं आहे.
अशांपैकीच काहींचा परिचय करून देणारा
हा आगळा-वेगळा ग्रंथ

पृष्ठसंख्या: 
114
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
978-81-7434-653-7

गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन
अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे,
नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत.
ह्या निसर्गविरोधी वर्तनाला कारणीभूत आहे
विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती
आणि जीवनशैली.

त्यांना विरोध करणारं आणि संयमित
उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं
लेखन ‘गतिमान संतुलन’ ह्या मासिकातून
प्रकाशित होतं.
त्याच्या पहिल्या १२ वर्षांतील संपादकीय
लेखांचं हे संकलन : सर्वांची जीवनशैली
अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या
कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेले.

पृष्ठसंख्या: 
104
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
978-81-7434-653-7

गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन
अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे,
नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत.
ह्या निसर्गविरोधी वर्तनाला कारणीभूत आहे
विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती
आणि जीवनशैली.

त्यांना विरोध करणारं आणि संयमित
उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं
लेखन ‘गतिमान संतुलन’ ह्या मासिकातून
प्रकाशित होतं.
त्याच्या पहिल्या १२ वर्षांतील संपादकीय
लेखांचं हे संकलन : सर्वांची जीवनशैली
अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या
कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेले.

पृष्ठसंख्या: 
104
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
978-81-7434-471-7

शारीरिक आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोट
आज झालेला दिसतो.

तो औषधोपचारांनी नियंत्रणात येणं अशक्य आहे.

व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही कुटुंब,
समाज आणि पर्यावरण ह्यांच्या आरोग्यातूनच संभव आहे.

ह्या सर्व स्तरांवरचं आरोग्य सूर्याच्या आधारे कसं मिळवायचं-टिकवायचं,
ह्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक.

उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याच्या पुढे जाऊन
विधायक आरोग्याचा एकात्म विचार पुढे मांडणारं.

पृष्ठसंख्या: 
112
किंमत: 
रु. 90
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
April, 2011
ISBN No: 
978-81-7434-491-5

पर्यावरण म्हणजे नेमकं काय?
त्याचं तुमच्याशी काय नातं?
हवा – पाणी, नद्या – नाले, समुद्र – डोंगर,
गवत – वनस्पती, प्राणी – पक्षी, कीटक – मुंगी,
सूक्ष्म जीव अन् वन्य जीव
या सा-यांची या सृष्टीचक्रात नेमकी काय भूमिका?
शहरं, वाहनं, कारखाने, शेती, धरणं
यांचे नेमके काय परिणाम?
प्रदूषण, कचरा, ग्लोबल वॅार्मिंग, प्लास्टिक-
अशा समस्यांचा का पडतोय विळखा?
या सा-यावर काय उतारा?
उचलता येईल का आपला खारीचा वाटा?
अशा सर्व प्रश्नांची सुबोधपणे उकल करणारी

पृष्ठसंख्या: 
208
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
September, 2011