ISBN No: 
978-81-7434-692-6

केवळ स्त्रियांच्या कथनात्मक साहित्यातच नव्हे, तर
समग्र मराठी साहित्यपरंपरेमध्ये ज्यांचे स्थान लक्षणीय ठरते,
अशा लेखकांमध्ये सानिया यांचा समावेश होतो.

त्यांचे लेखन संख्यात्मक दृष्टीने मोजके असले,
तरी ते निश्चितपणे गुणवान व कसदार आहे.
आपल्याला भिडलेला, भावलेला अनुभव
त्याच्या सूक्ष्म कडा-कंगो-यांसह प्रतीकात्मक भाषेत
सानिया आपल्या कथांमधून साकार करतात.

बाह्यविश्वातील घटना-घडामोडींपेक्षा माणसांच्या
अंतर्मनातील हेलकावे-हालचाली
शब्दांकित करणा-या या कथांना एकाच वेळेस
समकालीन व सार्वत्रिक परिमाण प्राप्त होते.
त्यामुळे आपली निजखूण शोधण्याच्या प्रवासात
सानिया यांच्या निवडक कथांचे हे संपादन
वाचकाला मोठेच साहाय्य करील, यात शंका नाही.

पृष्ठसंख्या: 
326
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
February, 2014
ISBN No: 
978-81-7434-210-2

इतरांची आत्मसंतुष्टता अणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू
शकत नाही. इतरांसारखे मन:स्वास्थ त्याच्या वाट्याला
असत नाही. अज्ञानात सुख असेल, तर लेखक बहुतेक,
आयुष्य दु:खात आणि तापात काढतो.

प्रिया ही दु:खे शोधत जाते. तिचे आतापर्यंतचे छोटे
आयुष्य म्हणजेच दु:खांच्या शोधातला एक ‘प्रयोग’ किंवा
अनेक प्रयोगांची मालिका आहे.

शब्द देता येतात. लिहिण्याची हौसही देता येईल. शैली
तर दिली–घेतली जातच असते. परंतु जगण्याचा आशय
देता येत नाही.

हा आशय ज्याचा त्याने ‘कमवावा’ लागतो, तो
मिळवण्याची ईर्षा मुळातच असावी लागते.

या अर्थाने प्रिया तेंडुलकर हिचे या पुस्तकातील
लेखनकर्तृत्व तिचे स्वत:चे, स्व-कमाईचे आहे.

पृष्ठसंख्या: 
170
किंमत: 
रु. 160
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
July, 2012
ISBN No: 
978-81-7434-049-1

प्रिय मधू गानू,
तुमचे लेखन सरळ, साधे, नितळ, निरपेक्ष आणि
आतल्या ऊर्मीने लिहिलेले, उत्स्फूर्त आहे. खरे आहे.
लेखनाचा विषय झालेली माणसे आणि वाचक यांच्यामध्ये
लेखकाचे लेखनकौशल्य उभे नाही.

म्हणून आम्हांला वाटले की, या लेखांचे पुस्तक निघाले
पाहिजे.

पंचाहत्तरी हे निमित्त.

विजय तेंडुलकर

पृष्ठसंख्या: 
100
किंमत: 
रु. 60
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
March, 2007
ISBN No: 
978-81-7434-516-5

... आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणा-या या आठ कथा.
सूत्र एकच - कक्षेबाहेरची ओढ.
वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते,
अन् माणसाला निराळी ओढ लागते.
या सा-या कथा याच आकर्षणानं-मोहानं बाधलेल्या.
पण कुठेतरी
प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ...
अशा पुष्कळशा भावभावनांच्या सरमिसळीमुळे
नीतिनियमांना उल्लंघूनही
समाज-मर्यादेची चौकट न सोडलेल्या.
आणि म्हणूनच आरपार...

ही बाधा, हे आकर्षण याचा अत्यंत गांभीर्यानं केलेला विचार
हे जसं या कथांचं वैशिष्ट्य, तसंच
एकाच विषयाच्या कथांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य.
आकर्षणाची ही चमचमती बाधा - शिशीत काजवे ठेवावेत तशी -
एकत्रित ठेवून पाहायचा प्रयत्न !

पृष्ठसंख्या: 
166
किंमत: 
रु. 150
सद्य आवृती: 
December, 2010
ISBN No: 
ISBN 978-81-7434-185-3

मराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून
पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते.

हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह.

'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जन्मलेल्या प्रत्येकाला' हे आधीचे.

सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी,
कथेतील रौद्र नाटय हेरून ते साक्षात् समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी
मनातला हळवा गुंता हळूवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या
कथांची वैशिष्टये.

मात्र जीवनाकडे _ यात स्त्री-जीवन आले - पहाण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे
या लेखनाचे मोठे वैशिष्टय म्हणावे लागेल.

या कथांहून उजव्या कथा मराठीत भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही.
मात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या
कथा-संग्रहाचे महत्त्व.

पृष्ठसंख्या: 
222
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
September, 2011
ISBN No: 
978-81-7434-330-7

हास्यकथांचा हा संग्रह आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवावा,
फावल्या वेळी पुन:पुन्हा वाचावा आणि मनाला
ताजेतवाने करावे असा... नक्कीच!

हा लेखक माणसाच्या वागण्या-बोलण्यामध्ये असलेली
हास्यास्पदता उघड करतो आणि नसलेलीही निर्माण
करतो. मामंजीचे हे 'हास्यायन' मराठी विनोदबुद्धीचा
आगळावेगळा नमुना आहे.
यामध्ये लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी आहेत. गंभीरता
आणि बालिशता यांचा गंगाजमनी मेळ आहे आणि
विनोदांचे शेवट म्हणजे चकित करणारे धक्के आहेत.
मामंजीच्या या हास्यक्लबाचे 'आजीव सभासद'
होण्यासाठी तमाम मराठी वाचक पुढे सरसावतील,
याची मला खात्री वाटते.
- रा.ग. जाधव

पृष्ठसंख्या: 
86
किंमत: 
रु. 75
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
January, 2010
ISBN No: 
978-81-7434-288-1

“यापुढं कुठं असशील तू?”

“तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम
सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला.

आपण घर बंद करून जायला निघतो,
सारी आवराआवर झालेली असते,

काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास
खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच
सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची
म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही
अगदी चुकून नाही ना राहिलेलं ? नजरचुकीनं ?”

गावा-देशांची, जाति-धर्माची वेस ओलांडून
माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत
वेध घेणा-या सानियाच्या दीर्घकथा.

पृष्ठसंख्या: 
184
किंमत: 
रु. 160
प्रथम आवृत्ती: 
2004
सद्य आवृती: 
March, 2010
ISBN No: 
978-81-7434-250-8

आपल्या सामाजिक विचाराला आणि आचाराला आपल्या समग्र
कर्तृत्वाचा गाभा मानणारे सावरकर म्हणजे काही शास्त्राधार पाहून-
दाखवून समाज बदलायला निघालेले समाजसुधारक नव्हते, तर
`धर्मग्रंथावर समाजसंस्था उभी करण्याचे दिवस संपले', अशी घोषणा
करणारे बुद्धिप्रामाण्यवादी कर्ते विचारवंत होते. हिंदू समाजाला जखडून
टाकणा-या `सप्तबंदी'च्या बेड्या आपल्या घणाघाती युक्तिवादाने
खळाखळा तोडून टाकणारे ते क्रांतिकारक होते. त्यांनी रत्नागिरीत जसे
पतितपावन मंदिर उभारले, तशी पूर्वास्पृश्यांना अनेक जुनी मंदिरे
खुली करून देण्यासाठी यशस्वी आंदोलनेसुद्धा केली.
सावरकरांचे क्रांतिकारक समाजकार्य पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,
भाई माधवराव बागल, `सत्यवादी'कार बाळासाहेब पाटील प्रभृती
ब्राह्मणेतर सुधारकही प्रभावित झाले होते. `ते क्रांतिकार्य पूर्ण
करण्यासाठी आपले उरलेले आयुष्य परमेश्वराने सावरकरांना द्यावे',
अशी प्रार्थना महर्षी शिंदे यांनी केली होती. सावरकरांच्या त्या
समाजक्रांतीच्या यशाचे रहस्य कशात होते, याची साधार उकल करून
दाखवणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दाम
वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे.

पृष्ठसंख्या: 
273
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
January, 2010
ISBN No: 
ISBN 978-81-7434-522-6

कथेसाठी कठीण दिवस असताना हा वाड्मयप्रकार समर्थपणे हाताळणा-या आजच्या मोजक्या कथालेखकांपैकी मधुकर धर्मापुरीकर हे महत्वाचे नाव.
आशय - विषयानुरूप लेखनशैली, कथेला विनोदी होऊ न देता कथेतला विनोद सांभाळणे आणि अनुभवांचा अगदी वेगळ्या प्रकारचा निवडलेला परिसर ही धर्मापुरीकरांच्या कथांची महत्वाची वैशिष्ट्ये.
आजची कथा ही आशय-अनुभवाच्या दृष्टीने परिपक्व होत आहे, मात्र त्याकडेच अधिक लक्ष दिल्याने तिच्या गोष्टीरुपाला धक्का पोचतो आहे. मधुकर धर्मापुरीकर यांची कथा त्यांच्या कथनशैलीमुळे आपले गोष्टीरूप सांभाळून उभी असते. धर्मापुरीकारांची कथा वाचनीय होते आणि लक्षणीय ठरते ती यामुळेच.

पृष्ठसंख्या: 
164
किंमत: 
रु. 140
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
January, 2011

''यापुढं कुठं असशील तू?''
''तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला.
आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवरी झालेली असते,
काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं? नजरचुकीनं?''
गावा-देशांची, जाति-धर्मांची वेस ओलांडून
माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणाऱ्या सानियाच्या दीर्घकथा.

किंमत: 
रु. 90
सद्य आवृती: 
October, 2011