ISBN No: 
978-81-7434-909-5

नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य.
फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले.
आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले...
स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज
दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची
सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
182
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
September, 2015
ISBN No: 
978-81-7434-909-5

नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य.
फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले.
आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले...
स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज
दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची
सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
182
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
September, 2015
ISBN No: 
978-81-7434-841-8

युरोपच्या टूर्स आखणा-या अनेक प्रवासी कंपन्या गेली काही
वर्षे भारतभर आढळतात. परंतु त्या टूर्समध्ये स्वत:च्या खास
आवडीनिवडींना मुरड घालावीच लागते. युरेलचे ठरावीक
मुदतीचे पास काढून वेळापत्रक पाहून व इंटरनेटची मदत
घेऊन कमी दरात, स्वत:च्या आवडीनुसार युरोपचा प्रवास
करणे सहज शक्य आहे, हे अनेकांना माहीतच नसते. ती
माहिती मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी ‘युरोपचा प्रवास’
हे पुस्तक लिहिले आहे. युरेल पास, व्हिसा, पासपोर्ट, परकीय
चलन, कस्टम्स, विमा यांच्या कायदेशीर बाबींबरोबरच नित्याच्या
व्यवहारात लागणा-या बारीकसारीक खाचाखोचा, कुठे काय
पाहावे, कुठे राहावे इत्यादी बारकावे यात दिले आहेत. याशिवाय
लेखकांनी स्वत: प्रवास केलेला असल्यामुळे स्वानुभवांचे कवडसे
जागोजागी दिसतातच. हे पुस्तक वाचून युरोपच्या प्रवासाच्या
तयारीला लागावेच असे वाटेल.

पृष्ठसंख्या: 
226
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2001
सद्य आवृती: 
February, 2015
ISBN No: 
978-81-7434-730-5

मणिपूर... प्राचीन काळापासून 'सुवर्णभूमी' म्हणून
नावाजला गेलेला ईशान्य भारतातील रमणीय, निसर्गसुंदर प्रदेश.
समृध्द संस्कृतीचा वारसदार असणारा हा प्रदेश
स्वातंत्र्यानंतर काहीसा उपेक्षित, दुर्लक्षित राहिला.

त्या प्रदेशातील असंख्य पर्यटनस्थळांची तपशीलवार माहिती देणारे,
तिकडे जायला प्रवृत्त करणारे पुस्तक...

पृष्ठसंख्या: 
144
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
May, 2014
ISBN No: 
978-81-7434-493-9

हे नेहमीच्या अर्थानं प्रवासवर्णन नाही.
निरनिराळ्या देशांचा वर्तमान आणि
भूगोल यांतून इतिहासाचा वेध घेत केलेला
हा मनोज्ञ लेखनप्रपंच.

आपली अनुभवश्रीमंती वाचकांमध्ये
वाटून घ्यावी, एवढयाच उद्देशाने
साधलेला हा सहजसंवाद.

पृष्ठसंख्या: 
256
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
July, 2012
ISBN No: 
978-81-7434-463-2

हा प्रवास आहे जगभराचा.
अनेक स्थळं प्रसिध्द-अप्रसिध्द.
पर्वत अन् सागर. अरण्यं अन् उद्यानं.
नद्या, तळी, दरीखोरी. शहरं, गावं, खेडी.
घरं, नाटयगृहं, अगदी स्नानगृहं अन् स्वच्छतागृहंसुध्दा !
आणि ही सारी ठिकाणं आपल्याला नुसती दिसत नाहीत,
तर ती आपल्याला भेटतात, आपल्याशी बोलतात.
कारण या ठिकाणांकडे जाताना आपल्यासवे आहे.
एक संवेदनशील, रसिक मन, एक विवेकी जागरूक व्यक्तिमत्त्व.

भेटलेल्या प्रत्येक स्थळाला एक अंगभूत व्यक्तिमत्त्व
बहाल करणारी समृध्द ललितकृती -

पृष्ठसंख्या: 
116
किंमत: 
रु. 110
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
November, 2010
ISBN No: 
978-81-7434-007-8

श्री.म. वा. धोंड हे कायम प्रवासात असतात. मुंबईतील ‘साहित्य
सहवास’मधल्या आपल्या घरातल्या खुर्चीत बसून ते एक गाडी
पकडतात. ‘पिपात मेले’. ‘आनंदी गोपाळ’. ‘पोत’. ‘स्वामी’. लता
मंगेशकरांनी गायिलेले तुकारामाचे अभंग. बालकवींची ‘रमाई’...
नाहीतर ‘नाच ग घुमा’.

मूळ गाडी मर्यादित धावेची असली, तरी धोंड ती आपल्याला
हव्या त्या वेगाने फिरवतात. हे करताना त्यांचे दिशेचे भान चुकत
नाही. गाडीवरचे नियंत्रण सुटत नाही. ‘अपघात’ घडत नाही. गाडी
मोडत नाही. कोणत्याही कुशल ‘ड्रायव्हर’प्रमाणे या सगळ्याचे
पक्के भान ते ठेवतात.

पोचण्याचे ठिकाण ठरलेले असते, पण वाटेत जे जे भेटते, ते
स्वतंत्रपणे मन गुंतवणारे, चकित करणारे, दाद द्यावी असे असते.
अशी कितीतरी ठिकाणे जागोजाग ते आपल्याला भेटवतात.
यामुळेच हे ‘प्रवास’ सरळ रेषेतले आणि कामापुरते नाहीत, हे
मुक्त आणि मजेचे आहेत.

वाचकाला बरोबर घेऊन या पुस्तकात श्री.धोंड यांनी असे एकूण
अकरा प्रवास केले आहेत. त्यांची लेखनशैली व्यासंगी तितकीच
रसीली, कधी गंभीर, कधी मिष्किल, कधी रंगेल आणि कधी
चावटदेखील. गरजेनुसार यात उपरोधाची धार.

अभ्यासाने सामान्य पंडितांना येते ते ‘जाड्य’ या पुस्तकात
औषधालाही सापडणार नाही.
-विजय तेंडुलकर

पृष्ठसंख्या: 
232
किंमत: 
रु. 140
प्रथम आवृत्ती: 
1994
सद्य आवृती: 
June, 1998
ISBN No: 
978-81-7434-309-3

न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे
न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी
त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत
भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम
आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला.

न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना
त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय
पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून,
हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.

पृष्ठसंख्या: 
96
किंमत: 
रु. 60
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
January, 2005
ISBN No: 
978-81-7434-268-3

मला सांगा, गोव्यात काय नाही?
हा प्रश्न विचारणारा मुशाफिर तुम्हांला वेगळाच गोवा
दाखवतोय. त्यामुळे गोवा पर्यटनाच्या अधिकृत
गाइडमध्ये जी आणि जेवढी माहिती असते, ती आणि
तेवढी तुम्हांला या पुस्तकात कदाचित सापडणार
नाही. पण गोव्याला जायला हवं, अमुकतमुक
पाहायलाच हवं, ही ओढ मात्र हे पुस्तक तुमच्या
मनात नक्की निर्माण करेल. स्वच्छंदीपणे, अगदी
मनासारखा ज्यांना गोवा फिरायचाय,
त्यांना इथे आणखी केवढं,
काय-काय आहे,
याची झलक नक्की यातून मिळेल.

पृष्ठसंख्या: 
68
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
August, 2011
ISBN No: 
978-81-7434-247-8

जेरुसलेम...ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान
या तिन्ही समाजांना अत्यंत श्रद्धेय असणारं
हे शहर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं सतत
धुमसत राहिलं आहे. इस्त्राइलच्या
स्थापनेपासून गडद होत गेलेला ज्यू-अरब
संघर्ष आता अत्यंत स्फोटक अवस्थेत
पोचला आहे. त्या संघर्षाच्या गेल्या वर्षीच्या
अत्यंत निर्वाणीच्या टप्प्यावर निळू दामले हे
प्रसिद्ध पत्रकार त्या युद्धभूमीला प्रत्यक्ष भेट
देऊन, तेथली स्थिती निरखून आले. त्यांनी
लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्या संघर्षाचा
अथपासून इतिपर्यंतचा इतिहास नाही, पण
सर्वसामान्यांना तो जटिल प्रश्न समजू शकेल
अशा रीतीने केलेले माहितीपूर्ण, रोचक-रंजक
वृत्तांतकथन आहे. विषयाला थेट जाऊन
भिडणा-या, व्यक्ती-प्रसंगांच्या नेमक्या
निरीक्षणातून किस्से सांगत-गुंते उलगडवत
नेणा-या विशेष शैलीत केलेले युद्धभूमीचे हे
आगळेवेगळे प्रवासवर्णन आहे.

पृष्ठसंख्या: 
167
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2003