ISBN No: 
978-81-7434-862-3

मनानं आणि शरीरानं विकसित व्हायचा काळ
म्हणजे किशोरावस्था. आयुष्यातील एक अवघड वळण. काहीसं धोक्याचंही.
स्वतःचीच एक नवीन ओळख व्हायला लागते – एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून.
स्वप्नरंजनाला सुरुवात होते. पण हे सगळं का आणि काय घडतंय,
याचा अर्थ मात्र उमगत नाही. त्यामुळे स्वप्नांभोवती धास्तीची,
काळजीची काळी किनार उमटते.
ओढ-आकर्षणाचा नेमका अर्थ कळत नाही. कधी नको इतका संकोच,
कधी आक्रमकता. या ओढीच्याही विविध छटा अनुभवाला येतात, पण
त्यांच्यातला नेमका फरक तर उमगत नाही. भावनेच्या आवेगात
आयुष्याचं तारू भरकटण्याची शक्यता निर्माण होते. झपाट्यानं बदलत जाणा-या
स्वत:च्या शरीराबद्दल अज्ञान असतं. भिन्नलिंगी देहाबद्दल कुतूहल वा जिज्ञासा
असली तरी संकोचही असतो. साहजिकच निर्माण होतात गैरसमज, संभ्रम, शंकाकुशंका.
ते तसं होऊ नये म्हणून, किशोरावसथा ओलांडत असलेल्या अक्षरशः हजारो मुलामुलींना
गेल्या पंचवीस वर्षांत ज्यांनी कलोचित मार्गदर्शन करण्याचं व्रत आचरलं,
त्या साठे पतिपत्नींनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे वडीलधा-या हितचिंतकांच्या
भूमिकेतून केलेलं मनमोकळं हितगूज.
कोणताही आडपडदा न ठेवता मानवी देह-व्यवहाराचं त्यांनी केलेलं स्वच्छ
शैलीतलं विवेचन असंख्य तरूण-तरूणींना सुखी जीवनाची अंकलिपी शिकवील,
समाधानाचे आणि स्वास्थाचे धडे देईल. वाटेतल्या खाचखळग्यांबाबत
सावधानतेचा इशारा देत असतानाच सुंदर सहजीवनाचं रहस्य
उलगडून दाखवील.
किशोरावस्था ओलांडत असताना प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक
त्या सर्वांना हव्याशा वाटणा-या माहितीची शिदोरी ठरेल, यात शंकाच नाही.

पृष्ठसंख्या: 
228
किंमत: 
रु. 115
प्रथम आवृत्ती: 
2002
सद्य आवृती: 
April, 2015
ISBN No: 
978-81-7434-810-4

आपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्या
तब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊन
पालक बालरोगतज्ञांकडे येत असतात.
तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरे
देण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच,
पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित राहतात.
अशा सा-या बाबींचा परामर्श घेऊन
सोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहिती
आणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडून
करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

पृष्ठसंख्या: 
218
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2015
सद्य आवृती: 
December, 2014
ISBN No: 
978-81-7434-807-4

स्त्रियांसाठी योगासने ही पुरुषांसाठी करण्याच्या योगासनांपेक्षा फार वेगळी नाहीत.
मुले, संसार, जेवणखाण इत्यादी सांभाळून कामावर जाणाऱ्या स्त्रियांना एकावेळी
40 मिनिटे एवढा मोकळा वेळ मिळणे कठीण असते. कामाच्या जागेवर,
प्रवास करताना, घरात बसल्या बसल्या योगासनातील स्नायूंचे आकुंचन
आणि शिथिलीकरण, स्नायू व बंध यांना मिळणारे तणाव, श्वसनाकडे
लक्ष दिल्याने होणारा एकाग्रतेचा सराव, पाठीच्या, मानेच्या, खुब्याच्या स्नायूचा
'टोन' वाढवणे या हेतूने सर्व स्त्रिया साधी आसने दिवसभर करू शकतात.
अशा प्रकारे आपली निरामयता कमावू शकतात, टिकवू शकतात,
अशी योगासने हे प्रत्येक स्त्रीला एक वरदानच आहे.

-- डॉ. ह. वि. सरदेसाई

पृष्ठसंख्या: 
165
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
December, 2014
ISBN No: 
978-81-7434-631-5

रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच,
पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते;
अशा ग्रामीण भागालाच
डॉ. हिम्मतराव बावस्करांनी
आपलं कार्यक्षेत्रं मानलं.

ग्रामीण भागात जन्मलेल्या अन्
वाढलेल्या डॉ. बावस्करांनी
अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली.
साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू,
कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार
यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग
यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही
ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत.
या सा-या व्याधींबद्दलची सजगता
अन् उपचारांमधील तप्तरता
सा-यांच्या मनावर ठसवणारे

शोध ग्रामीण आरोग्याचा

पृष्ठसंख्या: 
130
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2013
सद्य आवृती: 
October, 2013
ISBN No: 
978-81-7434-487-7

‘आई होणं सोपं नाही गं बाई !’
अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्व’ आणि
तेवढेच पुरातन असे हे शब्द !
म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे.

मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता ?

तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं, याची
आजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत
पोचवणारा हा लेखाजोखा.

सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून, नवनवी उपकरणं,
बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके,
घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत.
नावासकट आत सर्व काही असणारं -

पृष्ठसंख्या: 
214
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
978-81-7434-234-8

कोणतीही अध्यात्मिक व्यक्ती प्राण्यांचे शव खाऊ शकत नाही. माझे
पोट ही ईश्वरी देणगी आहे. नैतिक दृष्टया प्राणिहत्या करून त्यांचे दफन
माझ्या पोटात मी करू इच्छीत नाही.
- बर्नार्ड शॉ
-
डॉ. कल्याण गंगावाल
एम्. बी. बी. एस. व एम्. डी. या दोन्ही परीक्षांत सुवर्णपदक.
बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा बहुमान.

ससून व के.ई.एम्. या रुग्णालयांत मानद प्राध्यापक.

शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टिकोनातून अनेक वर्षे सातत्याने
प्रचार करीत आहेत. अमेरिकेत व जगभर यावर व्याख्याने.
गुटका, तंबाखूविरोधी आंदोलनात सध्या प्रमुख सहभाग.

वृत्तपत्रांत अनेक लेख प्रसिद्ध. चित्रकलेचाही छंद आहे.
प्रमुख पुरस्कार : ‘शाकाहारप्रिय’, ‘समाजरत्न’, ‘शांतिसागर’.

डॉ. श्रीराम गीत
पुण्यात १९७० पासून वैद्यकीय व्यवसाय.
को-ऑर्डिनेटर, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट संचालित
संजीवन हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे.

व्यवसाय मार्गदर्शन, वैद्यकीय, सामाजिक
व विज्ञान विषयावरील पुस्तके प्रसिद्ध.

‘सृष्टिविज्ञान गाथा’ या द्विखंडात्मक ग्रंथास ९४-९५ चा
महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार.

पृष्ठसंख्या: 
84
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
1997
सद्य आवृती: 
October, 2012
ISBN No: 
978-81-7434-343-7

आपल्या मुलांशी बोलत असताना, तसंच
त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना, आजही
पालकांची गाडी एका विशिष्ट, नाजूक पण
महत्त्वाच्या मुद्दयाला अडते – लैंगिकतेच्या.
म्हणजे या बाबतीत बोलायला हवं, हे त्यांनाही
जाणवत असतं; पण अडचण असते ती ‘काय
सांगू’, ‘कसं सांगू!’ याची. त्याचवेळी
याबाबत कोणाशी बोलावं, हेही कळत नाही.

हे जाणूनच, गेली पंचवीसहून अधिक वर्षं
लैंगिकता शिक्षणाबाबत काम करणा-या साठे
पतिपत्नींनी मोकळेपणानं, पण संकोच
जाणवणार नाही, अशा सहज भाषेत साधलेला
हा संवाद, ‘आजच्या’ पालकांच्या मनामधील
अनेक संदेह दूर करेल आणि पालकत्वाच्या
त्यांच्या या वाटचालीत त्यांना निश्चितच
मार्गदर्शक ठरेल. केवळ ‘आई’नंच नव्हे, तर
‘बाबा’नंही वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक!

पृष्ठसंख्या: 
96
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
August, 2012
ISBN No: 
978-81-7434-164-8

ऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी,
ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर
स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे,
हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे....

... आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृध्दाश्रम, कौटुंबिक-कलह,
संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक
विषयांवरसुद्धा मैत्रिणीशी हितगुज करावे, तसे वाचकांशी
सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ
डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या ‘रविवार सकाळ’मधील ‘मुग्ध मधुर’
या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक

पृष्ठसंख्या: 
268
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
1999
सद्य आवृती: 
April, 2012
ISBN No: 
978-81-7434-051-1

वयात येण्याचे दिवस म्हणजे मुलीच्या आयुष्यातले
सर्वांत नाजूक दिवस. या दिवसांत तिच्या
शरीरात तर नाना घडामोडी होतातच, पण तिचं
मनही नवा आकार घेतं. समाजाच्या तिच्याकडून
अपेक्षा बदलतात. एकाच वेळी या अनेक बदलांना
तिनं सामोरं कसं जावं, हे सांगणारं म्हणजेच
‘यौवनाचा अर्थ’ सांगणारं पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 130
प्रथम आवृत्ती: 
1985
सद्य आवृती: 
July, 2012
ISBN No: 
978-81-7434-212-6

मधुमेहाचे निदान व उपचार यापेक्षा दैनंदिन जीवनात त्याला
सांगाती म्हणून समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. हीच खरी
त्याच्याशी मैत्रीपूर्ण लढत असते. पूर्णत: शास्त्रीय माहिती सोप्या
भाषेत व थोडक्यात देणारे हे पुस्तक कोणालाही स्वत:चे जीवन
आत्मविश्वासाने व सुखाने वाटचाल करण्यास मदत करू शकेल.

मधुमेह या विषयावरचे लिखाण, पुस्तके इंग्रजी व मराठीत भरपूर
झाली असली तरी आकडेवारीच्या बोजडपणामुळे, शास्त्रीय
काटेकोरपणामुळे ती कंटाळवाणी वाटतात. आचरणात आणणे
तर दूरच राहते. मधुमेहीच्या दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त
होईल अशी माहिती सहज, सोप्या भाषेत व थोडक्यात देण्याची
गरज होती. ती या पुस्तकाने भरून निघून मधुमेही अधिक
आत्मविश्वासाने व सुखाने आपले जीवन समृध्द करतील अशी
खात्री वाटते.

पृष्ठसंख्या: 
136
किंमत: 
रु. 115
प्रथम आवृत्ती: 
2001
सद्य आवृती: 
November, 2012