ISBN No: 
978-81-7434-301-7

आज प्रत्येकालाच कल्पनेच्या उपयुक्ततेत रस आहे,
खुद्द कल्पनेत नाही. अरे, मोहरीएवढं बी वटवृक्षाचं.
पण उद्याच्या अजस्त्र वटवृक्षाचे सगळे गुणधर्म
असतात त्याच्यात. पुढच्या विशाल वटवृक्षात
सर्वांनाच रस, पण बीजात नाही;
मग वटवृक्ष मिळावा कसा?

बीजात आनंदानं रस घेणारे वेडे फार थोडे.
चंगळवादाच्या वावटळीत जीव धरून असतील
कुठं कुठं! पण समाजाला आनंदानं जगता यावं,
अशी व्यवस्था निर्माण करणं हेच जर आपलं
उद्दिष्ट असेल, तर या वेड्यांच्या आनंदाला
अपरंपार महत्त्व आहे.

पृष्ठसंख्या: 
132
किंमत: 
रु. 80
सद्य आवृती: 
November, 2004
ISBN No: 
ISBN 978-81-7434-568-4

लग्न म्हणजे काय?
संस्कार की करार? की आंधळा जुगार?
आणि लग्न कशासाठी?
स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी?
की एकमेकांना समजून घेण्यासाठी? विश्वास देण्यासाठी?
प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यात
काही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं?
स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या छटा दाखवतं?
नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पाश्र्वभूमीला
नर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का?
विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेत
कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध
अशा अनेक गोष्टींचा शोध घेणारं
हसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक

पृष्ठसंख्या: 
66
किंमत: 
रु. 70
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-512-7

लोकांना कलावंतांना भेटण्याची,
बघण्याची जाम क्रेझ.
आणि दुसरी क्रेझ?
स्वत: टीव्हीवर, पडद्यावर झळकायची.
मग रिअँलिटी शोज पॉप्युलर होतात.
इव्हेंट मॅनेजमेंटसाठी टीम जमा होतात.
पैशाचे पाणी अन् प्रसिध्दीचे वारे वाहतात.
पण या पैसा अन् प्रसिध्दीला भुलून
आपण पिढयानपिढयांच्या कलेलाच
तोतया ठरवत नाही ना?
कलाकाराच्या मोजमापासाठी
कलेच्या सोन्याच्या नाण्याऐवजी
बाकीच्याच कवडयारेवडयांचा
विचार करत नाही ना?
आपल्या वेगवेगळया सोंगांतून
आजच्या बेगडी आयुष्यावर अन्
त्यातल्या दांभिक दुटप्पीपणावर
झगझगीत झोत टाकणारा

पृष्ठसंख्या: 
64
किंमत: 
रु. 70
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
September, 2010