ISBN No: 
ISBN 978-81-7434-340-6

'उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडणं
किती अवघड असतं?
एक रुपयाचं नाणं 10 कि.मी. अंतरावरून
बंदुकीनं अचूक टिपण्याएवढं!'
हे साधलं भारतीय शास्त्रज्ञांनी.
ही कथा त्यांचीच!
त्यांनी पाहिलेल्या अफाट स्वप्नांची.
त्यांच्या अथक प्रयत्नांची, परिश्रमांची.
त्यांच्या अपयशाची,
अपयशातूनही टिकलेल्या जिद्दीची!
आणि सामान्य भारतीयांबाबत त्यांना
असलेल्या कळकळीची-

पृष्ठसंख्या: 
146
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2005
ISBN No: 
ISBN 978-81-7434-320-8

माणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणा-या
एका अद्भुत यंत्राची चित्तथरारक कथा.
वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची,
यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची,
सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही.
असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही...

पृष्ठसंख्या: 
257
किंमत: 
रु. 600
प्रथम आवृत्ती: 
2005
ISBN No: 
ISBN 978-81-7434-592-9

गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात
शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती,
वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ,
गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी
बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र.
पण यातल्या कितीतरी गोष्टी
शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी
आणि त्याही आपल्या भारतात !
आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव
आणि अशा कितीतरी महान गणितज्ञांची
भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित.
हे गणित आणि त्यातले सिध्दांत
संस्कृत भाषेतच का अडकून पडले?
त्याचे आजच्या संगणकयुगाशी
काही नाते आहे का?
या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारा
मौल्यवान ग्रंथ.

पृष्ठसंख्या: 
164
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
December, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-592-9

गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात
शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती,
वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ,
गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी
बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र.
पण यातल्या कितीतरी गोष्टी
शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी
आणि त्याही आपल्या भारतात !
आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव
आणि अशा कितीतरी महान गणितज्ञांची
भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित.
हे गणित आणि त्यातले सिध्दांत
संस्कृत भाषेतच का अडकून पडले?
त्याचे आजच्या संगणकयुगाशी
काही नाते आहे का?
या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारा
मौल्यवान ग्रंथ.

पृष्ठसंख्या: 
154
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
December, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-187-7

बघता बघता विसावं शतक संपलं.
काय दिलं त्यानं मानवजातीला?
गर्दी, प्रदूषण, संहारविद्या, सर्वनाशाची बीजं;
का पदार्थविज्ञान, रसायन, दळणवळण, अंतराळ-संशोधन
अशा शास्त्रांची मूलतत्त्वं?
मार्कोनी, फॅरेडे, रॉबर्ट गोडार्ड, राईट बंधू, आइन्स्टाइन,
नील्स बोहर, जोहान मेंडेल, इयान विल्मुट
अशा अगणित शास्त्रज्ञांनी अनेक विषयांत शोध लावून समृध्द केलेल्या
विसाव्या शतकातील निवडक शोधांची ओळख करून देणारा ग्रंथ.

पृष्ठसंख्या: 
672
किंमत: 
रु. 1000
प्रथम आवृत्ती: 
2000
सद्य आवृती: 
February, 2009
ISBN No: 
ISBN 978-81-7434-107-5

सूर्य का चकाकतो?
तारे का लुकलुकतात?
ग्रह आडवे तिडवे का फिरतात?
ग्रहणे का लागतात?
अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश.
ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान.
मूलभूत सैद्धान्तिक चौकट पुरवते विज्ञान
आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान.
शिवाय जुने प्रश्न सोडवताना अवचित नव्याने समोर येणा-या
अदभूत, थरारक गोष्टी- कृष्णविवरे, कृष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार...
खूप काही दडलेले या आकाशाच्या गूढगर्भामध्ये!
'आकाशाशी जडले नाते' घडवते त्याचेच दर्शन.
खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून
अद्ययावत माहितीपर्यंत...
जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत...
आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत...
सचित्र देखण्या पानापानातून घडते ही अवकाशाची सफर.
आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करणारे

पृष्ठसंख्या: 
354
किंमत: 
रु. 1200
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
June, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-584-4

वेद म्हणजे फक्त देवांची स्तुती करणा-या ऋचा नाहीत.
वैदिक वाड्मय म्हणजे निव्वळ
यज्ञयाग वा कर्मकांडाची वर्णने नाहीत.
वेदकालीन ऋषींनी गणिताचा मूलभूत विचार केला होता.
आजही अचंबा वाटेल,
असे खगोलशास्त्राचे ज्ञान त्यांनी मिळवले होते.
ग्रह-तारे-नक्षत्रांच्या गतीवरून कालगणनेचे
अचूक मोजमाप करणारे पंचांग ते मांडत होते.
भारताची ही तेजस्वी ज्ञानपरंपरा
साधार दाखवणारा आद्य ग्रंथ
प्रथमच मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवणारे

पृष्ठसंख्या: 
98
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
September, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-579-0

पृथ्वी हा जलग्रह खरा,
पण त्याच्यावर पेय जल फार थोडे आणि मर्यादित.
फुगणारी लोकसंख्या अन् विषारी प्रदूषण यांमुळे
पाण्याचा तुटवडा वाढतच जाणार.
भविष्यात युद्धे होतील ती पाण्यासाठी.
प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा,
प्रत्येक जनसमूहाच्या आयुष्यक्रमाचा
अन् प्रत्येक संस्कृतीच्या वाटचालीचा
आधार असणा-या या पाण्याच्या विविध पैलूंचा मागोवा

पृष्ठसंख्या: 
220
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
August, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-575-2

निसर्ग फक्त `असतो'. तो दुष्ट नाही आणि सुष्टही नाही.
तो सुंदर नाही, कुरूप नाही; कनवाळू नाही आणि
क्रूरही नाही. तो फक्त त्याच्या स्वयंभू स्वरूपात,
अंगभूत नियमांनुसार वागत `असतो'.

निसर्गाच्या नियमांमधूनच उत्क्रांती जन्म घेते आणि
उत्क्रांतीच्या नियमांमधून माणूस जन्माला येतो.
केवळ माणूसच नाही, तर सर्वच जीवसृष्टी.

उत्क्रांतीच्या अभ्यासातून उमगते माणूस आणि त्याचा
भोवताल यांमधील नाते. अदभुत, उत्कंठावर्धक आणि
अविश्वसनीय वाटावे, असे नाते! मात्र कितीही अविश्वसनीय
वाटले, तरी विज्ञानाच्या नियमांनुसारच आकार घेणारे!!

माणूस असा का झाला आणि असा का वागतो, याचा
उत्क्रांतीच्या नजरेने घेतलेला हा चित्तथरारक वेध.

पृष्ठसंख्या: 
346
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
July, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-537-0

अणुभट्टी आणि अणुबाँब या एकाच नाण्याच्या दोन बाजू.
एक जग उजळवणारी तर दुसरी राखरांगोळी करणारी.
अणुमध्ये दडलेली अमाप ऊर्जा, त्या ऊर्जेवर नियंत्रण राखण्याचे तंत्र,
अणुभट्ट्यांचे कार्य, त्यांच्या प्रकलपांमध्ये दडलेले धोके,
घातक अणुकचरा आणि त्याच्या विल्हेवाटीची समस्या
अणुशास्त्रातील अशा विविध पैलूंची सुबोध ओळख करून देणारे

अणुशक्ती

पृष्ठसंख्या: 
230
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
May, 2011