ISBN No: 
978-81-7434-238-6

कृष्णविवर हा शब्द काव्यात्म वाटला तरी ती संकल्पना
वैज्ञानिक आहे. ती खगोलशास्त्रीय संकल्पना बरीच गुंतागुंतीची
आणि किचकट असल्यामुळे समजून घ्यायला अवघड आहे.
त्या संकल्पनेशी संबंधित गणिती सूत्रे म्हणजे सर्वसामान्यांच्या
दृष्टीने तर दुर्लघ्य पर्वतच. पण असे क्लिष्ट विषय सोप्या
भाषेत समजावून देण्याची हातोटी ज्या मोजक्या मान्यवर मराठी
लेखकांना साधली आहे, त्यांच्यात प्रा. मोहन आपटे यांचा
आवर्जून समावेश करावा लागेल. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक
म्हणजे कृष्णविवराबद्दलची श्वेतपत्रिकाच आहे, असे म्हटले तर
ते मुळीच वावगे ठरणार नाही.
कृष्णविवर म्हणजे काय, या प्रश्नापासून कृष्णविवराच्या
निर्मिती-स्थिती-लय या त्रिविध अवस्था असतात का, या प्रश्नांपर्यंत
अनेक प्रश्नोपप्रश्नांची सविस्तर, साधार उत्तरे या पुस्तकात
दिली आहेत. सृष्टीच्या निर्मितीचे गूढगुंजनात्मक कोडे सोडवण्याच्या
प्रयत्नात असणा-या असंख्य खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनाचे
निष्कर्ष-दुवे एकमेकांशी जोडून कृष्णविवराचा रहस्यभेद करणारी
ही सुसंगत कथा प्रा. आपटे यांनी जिज्ञासू वाचकांना सांगितली
आहे.
गणिती सूत्रे ज्यांना क्लिष्ट वाटतात त्या वाचकांना गणितावर
आधारित खगोलशास्त्रीय संकल्पना निव्वळ विवेचनातून समजावून
देण्याचे अवघड काम यशस्वीपणे त्यांनी पार पाडले आहेच,
पण तशा सूत्रांची भीती न बाळगणा-या जिज्ञासूंसाठी कृष्णविवरच्या
संकल्पनेशी निगडित असणारी काही सोपी गणिती सूत्रेही
त्यांनी मुद्दाम पुस्तकाच्या शेवटी दिली आहेत.
जिज्ञासूंबरोबर जाणकारांनीही आवर्जून वाचावे आणि दाद
द्यावी, असे हे पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
152
किंमत: 
रु. 125
प्रथम आवृत्ती: 
2002
सद्य आवृती: 
October, 2010
ISBN No: 
978-81-7434-749-7

गणित म्हणजे किचकट आकडेमोड !
छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ !
गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या!
छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक
गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी!
अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण!
गणित अजिबात आवडत नसणाऱ्या
अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या
गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या
साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या -
विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना
गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या -
गणितगप्पा

पृष्ठसंख्या: 
112
किंमत: 
रु. 100
सद्य आवृती: 
September, 2014
ISBN No: 
978-81-7434-708-4

सामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचे
शोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदर
क्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे! गेल्या शंभर वर्षातली
माणसाच्या कार्यकतृत्वाची कहाणी प्रतिभावान पण परधर्जिण्या
संशोधकांची, आपल्यापुरतं पाहणा-या स्पर्धांध शासनांची;
संशोधनासाठी नव्यानं उभारलेल्या नगरींची आणि बाँबखाली चिरडून
गेलेल्या हिरोशिमा-नागासाकी या नरकपुरींची; प्रत्यक्ष युध्दांची-कावेबाज
कारस्थानांची; फसव्या वाटाघाटींची; तुटलेल्या स्नेहसंबंधांची; माणूस
या अदभूत गोष्टीची. खरं म्हणजे तुम्हाआम्हा सगळयांची! या काळोख्या
कहाणीत आईनस्टाईन, लिओ झलार्ड, बर्ट्रांड रसेल, जोसेफ
रोटब्लाट, मॅथ्यू मेसेलसन... अशी काही प्रकाशपानं आहेत. काळोखात
काजळायचं की प्रकाशात उजळायचं, हे आपल्यालाच ठरवायचं
आहे... वेळ थोडाच आहे... पण एक मार्गदर्शक मंत्र आहे-
नो मोअर हिरोशिमाज्!

पृष्ठसंख्या: 
370
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
June, 2014
ISBN No: 
978-81-7434-748-0

गणित म्हणजे किचकट आकडेमोड
छे s, गणित म्हणजे तर्कशुद्ध विचारांचा खेळ !
गणित म्हणजे डोके गरगरवणा-या समस्या
छे छे, गणित म्हणजे बुद्धीला धारधार बनवणारे घाव !
गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी
अजिबात नाही! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण !
गणित अजिबात आवडत नसणा-या
अन् गणिताशिवाय इतर आवड नसणा-या
गणितात रमणा-या अन् गणितापासून लांब पळणा-या
सा-यांनाच गणिताची गोडी लावणा-या –
विद्यार्थी पालक – शिक्षक या सा-यांना
गणितातील सार अन् तत्वं सोपं करून सांगणा-या
या गणितगप्पा

पृष्ठसंख्या – दोन्ही मिळून 215
किंमत – प्रत्येकी 100 रुपये

पृष्ठसंख्या: 
81
किंमत: 
रु. 100
सद्य आवृती: 
July, 2014
ISBN No: 
978-81-7434-662-9

भारतीय खगोलशास्त्राचा पाया
आर्यभटाने रचला, आणि त्याचा
कळसाध्याय भास्कराचार्यांनी
लिहला. हा गणितशिरोमणि
आठशे वर्षांपूर्वी निवर्तला, पण
गणिताच्या इतिहासात तो
अजरामर झाला. आजही त्यांची
‘लिलावती’ गणितज्ञांना मोहिनी
घालते आणि भास्कराचार्यांच्या
उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते.
कुशाग्र बुध्दिमत्ता, गणिती
विद्वत्ता, पांडित्य आणि कवित्व,
अशा गुणांचा सुरेख संगम, असे
होते त्यांचे व्यक्तित्व. सह्यगिरीच्या
कुशीत जन्माला आलेला
हा गणिती, भारतीय संस्कृतीचे
एक रत्न होते यात शंकाच नाही.
सन २०१४ मध्ये भास्कराचार्य
यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत
आहेत. त्यानिमित्त त्यांची ओळख
सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांना
‘गणकचक्रचूडामणि भास्कर’ ही
पुस्तकरूपी मानवंदना.

पृष्ठसंख्या: 
60
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
2014
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
978-81-7434-088-7

खरा प्रतिभासंपन्न गणिती आहे, निसर्ग.
पानांत आणि फुलांत, पशूंत आणि पक्ष्यांत,
मानवांत आणि फळाफुलांनी डवरलेल्या सृष्टीत,
जिथे पाहावं, तिथे निसर्गानं गणित कोरलं आहे.
निसर्गाचं गणित शुष्क नाही, नीरस नाही,
रटाळ नाही आणि क्लिष्ट तर नाहीच नाही.
निसर्गाचं गणित सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं आहे.
निसर्गाच्या गणितात एक दिमाख आहे, सौष्ठव आहे.
एका साध्या संख्याशृंखलेतून त्याचं प्रत्यंतर येतं.
त्या शृंखलेच्या गुणधर्मात आपलं मन हरवून जातं.
असं काही असू शकेल, याचं आपल्याला आश्र्चर्य वाटतं,
फुलांच्या पाकळ्यांत, वनस्पतींच्या पानांत,
सुंदर सुंदर कलाकृतींत आणि मानवाच्या आकारांत,
भूमितीच्या आकृत्यांत आणि साध्या साध्या खेळांत,
ही संख्याशृंखला प्रकटते, सा-या सा-या निसर्गात.
अशा या अद्भुत शृंखलेचे विविध आविष्कार
हाच ‘निसर्गाचे गणित ’ या पुस्तकाचा विषय आहे.

पृष्ठसंख्या: 
134
किंमत: 
रु. 110
प्रथम आवृत्ती: 
1993
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
978-81-7434-087-0

माणसांचं सारं जीवन संख्यांशी निगडीत असतं.
रात्रंदिवस आपणा सर्वांना संख्यांशीच खेळावं लागतं.
पण बहुतेकांना त्यांच्याशी जवळीक साधू नये, असं वाटतं.
संख्यांनाही व्यक्तित्व असतं, हे अनेकांना माहीतही नसतं.
आपल्या हाताशी असतात फक्त दहा अंक.
त्यांच्यापासून निर्माण होणा-या संख्या असतात अनंत.
त्यांचेच गुणधर्म असतात आश्र्चर्यकारक आणि असंख्य.
बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार.
या चारच क्रिया संख्यांना देतात अद्भुत आकार.
संख्यांचे गहिरे रंग,
हा आहे, संख्यांच्या गूढत्वाचा एक शोध.
संख्यांच्या गहन सागरातील आश्र्चर्यांचा वेध.
संख्यांच्या सागरात जो कुणी खोल खोल बुड्या मारील,
त्याला संख्याच आपलंसं करतील,
आणि आपल्या खजिन्यातील अमूल्य रत्नं दाखवतील.

पृष्ठसंख्या: 
134
किंमत: 
रु. 120
प्रथम आवृत्ती: 
1993
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
978-81-7434-085-6

सूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ?
चंद्रसूर्यांना ग्रहण का लागतं ?
धूमकेतू अचानक कसे येतात ?
आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ?
आणि तारा तुटतो म्हणजे काय होतं ?
हजारो वर्षं मानवाला आकाशात दिसणारे असे चमत्कार.
त्यांच्या निरीक्षणातून मानवानं
अवकाशझेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवलं.
आणि आज सूर्यमंडळ भेदून
अनंताचा प्रवास करण्याची माणूस ईर्षा बाळगतोय.
लहानथोर सा-यांना भुरळ घालणा-या खगोलशास्त्रातील
अनेक शंकांची उत्तरं देणारं पुस्तक.

खगोलशास्त्र

पृष्ठसंख्या: 
244
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
August, 2012
ISBN No: 
978-81-7434-457-1

हजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं.
कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी.
माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही.
त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं !
शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल,
अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन.
किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या.
या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक.

अवकाश

पृष्ठसंख्या: 
230
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
April, 2012
ISBN No: 
978-81-7434-113-6

मुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क.
हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅच
बघता येते आरामात घरबसल्या.
माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन -
डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात.
माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं,
माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचं
काम करतं तंत्रज्ञान.
माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचं
आजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक.

तंत्रज्ञान

पृष्ठसंख्या: 
224
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
January, 2013