सबिता गोस्वामी यांच्या अनुभवांचे पुस्तक प्रकाशित
mangangechya.JPG

    `महाराष्ट्राची कुळकथा' या पुस्तकाला `कृष्ण मुकुंद' पुरस्कार जाहीर !  
डॉ. नलिनी गुजराथी यांच्या वडिलांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा `कृष्ण मुकुंद' हा पुरस्कार यंदा राजहंस प्रकाशित आणि डॉ. मधुकर केशव ढवळीकर लिखित `महाराष्ट्राची कुळकथा' या पुस्तकाला मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे या पुरस्काराची व्यवस्था आहे.
   राजहंस प्रकाशित पुस्तकांचा गौरव !   
क्र.     पुस्तकाचे नाव   लेखक
1.      तांडव महाबळेश्वर सैल
2.      याला जीवन ऐसे नाव मोहन आपटे
3.      जनहितयाचिका वि. पु. शिंत्रे
4.     झिम्मा विजया मेहता
5.     रंग नाटकाचे पुष्पा भावे
6.     जावे भावनांच्या गावा डॉ. संदीप केळकर

------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्काराने सन्मानित वरील सातही लेखकांचे हार्दिक अभिनंदन !

या शिवाय अन्य `राजहंसी' पुस्तकांना पुरस्कार

1) नाशिक सार्वजिनक वाचनालयातर्फे देण्यात येणारा ग. वि. अकोलकर पुरस्कार यावर्षी आसावरी काकडे यांनी लिहिलेल्या इशावास्यम् इदं सर्वम् या पुस्तकाला मिळाला आहे.
2) तसेच डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांच्या गोफ जन्मांतरीचे या पुस्तकाला डॉ. म. वि. गोगटे या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
3) महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे उत्कृष्ट ग्रंथासाठी देण्यात येणारा पुरस्कार वैशाली करमरकर यांच्या संस्कृतिरंग या पुस्तकाला जाहीर झाला आहे.

पुरस्कार विजेत्या लेखिकांचे हार्दिक अभिनंदन !

आकाशवाणीवर ऐका `राजहंसी’ पुस्तक
'जेंव्हा गुराखी राजा होतो'
एका सामान्य गुराख्याच्या मुलाच्या खांद्यावर संस्थानाची धुरा आली. बडोदे संस्थानाचे अधिपती बनलेल्या श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांची कथा म्हणजेच "जेंव्हा गुराखी राजा होतो". आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर`अखंडित वाचित जावे’ या कार्यक्रमा अंतर्गत 1 फेब्रुवारी 2013 पासून दररोज रात्री नऊ वाजता निंबाजीराव पवार लिखीत आणि राजहंस प्रकाशित `जेंव्हा गुराखी राजा होतो’ या पुस्तकाचे वाचन सुरु झाले आहे.बालवयात गुरे चारणारा हा गुराखी मुलगा पुढे भारतातील श्रेष्ठ राजा कसा झाला, सरंजामी सत्तेचा विनयोग त्याने लोककल्याणासाठी कसा केला, अशा अनेक गोष्टी या पुस्तक वाचनातून कळू शकतील.

चिपळूण येथील साहित्य संमेलनातील राजहंसचे दालन
Sammelan13.jpg

  मानाच्या पुरस्कारांची हॅट्रिक ! 

Shardha-Sathe.jpgशारदा साठे :
साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार -"पांथस्थ" पुस्तकासाठी

Karuna Gokhale.jpg करुणा गोखले:
महाराष्ट्र फाऊंडेशन, साहित्य विभाग पुरस्कार "बाई माणूस" साठी


Vijaya Mehta.jpg विजया मेहता:
भैरू रतन दमाणी पुरस्कार "झिम्मा" या आत्मकथनासाठी

वाचा:
1. "तांडव" कादंबरीचे रसग्रहण
2. झिम्मा -मुंबई मिरर मधील परीक्षण
3. कॉंग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?- परीक्षण

राजहंसी पुस्तकांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

नवी दिल्ली येथील ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’तर्फे यंदाच्या वर्षी राजहंस प्रकाशनाला तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
'राजहंस' प्रकाशनाच्या मुरारराव घोरपडे लिखित 'एक झुंज शर्थीची' या पुस्तकाला कलात्मक पुस्तक विभागातील प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच 'राजहंस'च्या 'ग्रंथवेध' या गृहपत्रिकेलाही माहिती आणि प्रसार साहित्य विभागातील प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. याशिवाय वैशाली करमरकर लिखित 'संस्कृतिरंग' या पुस्तकालाही प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.
१९९६ पासून राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांना दरवर्षी हमखास मिळणा-या या राष्ट्रीय पुरस्काराची पंरपरा यंदाही सुरू राहिली आहे.
EkZunjCoverAward_0.jpg
GranthvedhAward.jpg
SanskrutirangAward.jpg