लेखकाचा पत्ता: 
22, प्रोफाइल इडन, ८ वी गल्ली, प्रभात रस्ता, पुणे - ४११ ००४. फोन- (०२०) २५४२३८४९
लेखकाची इतर माहिती: 
सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) जन्म : 25 जून 1952 एम.ए. (तत्त्वज्ञान) एम.ए. (प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास) 'द गीता : अ थिअरी ऑफ ह्यूमन अॅक्शन' या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी गुरुदेव रानडे-दामले पुरस्कार. विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मिळालेल्या 'करिअर अॅवॉर्ड' अंतर्गत 'कृष्ण : द मॅन ऍंड हिज मिशन' या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन. पेशाने विद्यापीठीय व्याख्याते. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विविध अध्यासनांचे समन्वयक प्राध्यापक म्हणून बरीच वर्षे कार्यरत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्याशाखीय व्यासंगाने अधिक समृध्द करणारे विचारवंत म्हणून मान्यता. अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे संपादन. 'तुकाराम दर्शन' या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह 15 संस्थांचे पुरस्कार 'उजळल्या दिशा' या नाटकासाठी राज्य शासनासह 10 संस्थांचे पुरस्कार साहित्य संस्कृती मंडळापासून साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक-सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध.