ISBN No: 
ISBN 978-81-7434-342-0
अनुवाद: 
शारदा साठे

मोहित सेन
भारतातील साम्यवादी चळवळीमधील
एक बिनीचे शिलेदार...
विसाव्या शतकातील तिशीनंतरच्या
साठ-सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात
त्या चळवळीने अनेक चढउतार पाहिले,
वेडीवाकडी वळणे पार केली,
उद्दिष्टे साध्य केली, पराभव पचवले.
त्या सर्व घडामोडींचे साक्षीदार असणारे
एक तत्त्वनिष्ठ नेते.

त्यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्राला
प्रेमाची, मैत्रीची, विविध नातेसंबंधांची,
वैयक्तिक आठवणींची
अशी जोड मिळाली आहे की,
साम्यवादी नेत्यांच्या आत्मचरित्रांमध्ये
हे आत्मचरित्र त्या वेगळेपणामुळे
ठळकपणे उठून दिसते.

वैयक्तिक आणि सामाजिक
अशा दोन्ही स्तरांवर मिळालेल्या
विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणा-या
एका मनस्वी कार्यकर्त्याची
ही नितळ पारदर्शी आत्मकथा
तितक्याच प्रवाही भाषाशैलीत आता
मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
साहित्य अकादमी अनुवादासाठीचा पुरस्कार 2012
पृष्ठसंख्या: 
390
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2006
ISBN No: 
ISBN 978-81-7434-488-5

'समान मानव माना स्त्रीला'
असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात.
वास्तवात मात्र 'किमान' मानव माना स्त्रीला
अशी विनवणी करावी लागते.
Man is a rational being.
माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अँरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे.
परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही.
म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली,
तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत.
कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून
आपणसुध्दा आधी 'मानव' आहोत हे सांगण्यास सुरुवात केली.
त्यांचे हे सांगणे म्हणजेच स्त्रीमुक्तिवाद.
किमान तो तरी सुज्ञपणे आणि तकनिष्ठ राहून समजून घ्यावा
यासाठी हा पुस्तक प्रपंच.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2009-10
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2012 (वैचारिक ग्रंथ विभागासाठी)
पृष्ठसंख्या: 
224
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
April, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-578-3

सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:।
मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,
तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो
(आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).

 फाळणीचे मूलकारण कोणते होते?
 जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी?
 फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची
राहणार होती?
 राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता?
त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता?
 अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण
झाले असते काय?
 हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते?
 ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला
असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते?
 आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर
भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे
लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा
फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप
काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे
नाव का घ्यावे लागले?

अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व
फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा,
फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा,
राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र सेवा संघाचा `सु. ल. गद्रे' साहित्यिक पुरस्कार (२०११-१२)
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मराठवाडा साहित्य परिषदेचा 'यशवंतराव चव्हाण' विशेष वाड्मय पुरस्कार (२०११-१२)
पृष्ठसंख्या: 
734
किंमत: 
रु. 750
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
August, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-547-9

आता माझं मला भरभर वाचता येतं.
खूपखूप गोष्टी सांग,
नाहीतर छानछान पुस्तकं वाचून दाखव,
अशी कटकट मी आजीकडे करत नाही.
तर नवीनवी पुस्तकं आणून द्या,
अशी भुणभुण आईबाबांकडे लावते.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
सौ. शशिकलाताई आगाशे स्मृती` बालवाङमयाचा पुरस्कार (२०११-१२)
पृष्ठसंख्या: 
62
किंमत: 
रु. 50
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
September, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-075-7

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली
समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली.
परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली.
तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा,
इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती;
त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा
संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण
कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती
झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले.
आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं
एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं...

तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर
वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं – मेयर ऑफ
बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय
मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून
नेली.!

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1996-97
पृष्ठसंख्या: 
196
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
1996
सद्य आवृती: 
March, 2011
ISBN No: 
978-81-7434-154-9

...मग ते आई-बाप म्हणतात
'मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे,
तिला सिनेमात टाकायचंय.' त्या मुलीकडे
बघून मला कळवळून येतं. मी सांगते
'शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर
तिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊ
नका.' माझा अनुभव आहे त्या मागे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार
पृष्ठसंख्या: 
68
किंमत: 
रु. 55
प्रथम आवृत्ती: 
1970
सद्य आवृती: 
December, 2012
ISBN No: 
978-81-7434-332-1

'नादवेध' ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करून
गान-रसिकांपुढे उभी केलेली 'अक्षर-मैफल' आहे.
ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीते
आणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती,
अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारी
बनला आहे.
नाटयगीते, चित्रगीते, भावगीते, मैफिली,
आठवणी आणि किस्से...
हव्याहव्याशा या नादप्रवासात वाचक बघता बघता रागांचा
अनुरागी श्रोता बनून जातो.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06
पृष्ठसंख्या: 
254
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
October, 2011