ISBN No: 
978-81-7434-474-8

चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिध्दांत मांडला दीडशे वर्षांपूर्वी. अनेक सूक्ष्म निरीक्षणे, विविध तपशीलवार नोंदी आणि या साऱ्यांची तर्कशुध्द गुंफण यांच्या वैज्ञानिक बैठकीवर रचलेला हा सिध्दांत. डार्विनच्या जन्माच्या द्विशताब्दीवर्षात उत्क्रांती सिध्दांताच्या विकासाचा वेध घेणारे

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2009-10
पृष्ठसंख्या: 
180
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
October, 2009

सार्‍या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणार्‍या गार्गीचा काळ खूप मागे पडला.
पण गार्गी अजून जिवंत आहे.

एकोणिसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब!
वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला,
’अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही?’

नुसता प्रश्न करूनच गुलाब थांबली नाही, तर सार्‍या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला.

रसुलाबाद घाट!

तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सार्‍या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहेत. तिच्याकडे पाहाताना गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं,
कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली?
गार्गी अजून जिवंत आहे...

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
ललितेतर वैचारिक विश्वनाथ पार्वती गोखले पुरस्कार 2002
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
बुलढाणा जिल्हा साहित्य संघाच्यावतीने कै. ताराबाई शिंदे उत्कृष्ट स्त्रीवादी साहित्य पुरस्कार 2003
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
कै. काकासाहेब गाडगीळ साहित्यिक पुरस्कार 2003
पृष्ठसंख्या: 
124
किंमत: 
रु. 85
ISBN No: 
ISBN 81-7434-225-9

मातीच्या ढेकळाला हात लावील तर त्याचे
सोने करील आणि लाकडाच्या ओंडक्याला
हात लावील तर त्याचे पोलाद बनवील
अशी अद्भुत किमयागार...

ध्यानीमनी नसतानाही जी झांशीसारख्या
मातब्बर संस्थानची राणी झाली आणि नियतीच्या
लहरी स्वभावामुळे जी अकाली विधवाही
झाली, अशी एक कालपटावरची बाहुली...

वैधव्यानंतरचे केशवपनासारखे जाचक निर्बंध
युक्तीप्रयुक्तीने दूर सारणारी एक स्वयंभू स्त्री...

संस्थाने खालसा करण्यामागचा कंपनी
सरकारचा कावा 1854 सालीच ओळखून
त्या सरकारचा दुटप्पीपणा वेशीवर टांगणारी
पहिली भारतीय संस्थानिक...

कसलेल्या इंग्रज सेनाधिका-यांनीही जिचे
युद्घनेतृत्व गौरवले अशी असंख्य भारतीय
क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता...

झांशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या अशा
विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा अप्रकाशित,
अस्सल कागदपत्रांच्या आधारे घेतलेला हा वेध...

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांच्यातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार 2003
पृष्ठसंख्या: 
222
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
August, 2012

केशवराव शिरवाडकर हे तात्यांचे धाकटे बंधू, त्यामुळे ग्रंथाला वैयक्तिक जिव्हाळ्याचा ओलावा लाभला आहे आणि अधिकृतताही आली आहे. परंतु केशवराव हे उत्तम समीक्षकही आहेत. त्यामुळे या ग्रंथातील विवेचनात आवश्यक तेवढी अलिप्तता, तटस्थताही आली आहे. आत्मीयता आणि अलिप्तता यांच्या संमीलनाचा हा दुर्मीळ योग आहे.

केशवरावांनी आपल्या पुस्तकामध्ये कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाचा बालपणापासून मागोवा घेतला आहे. सामाजिक जाणीव, एकाकीपणा, माणूसवेड, मिस्कीलपणा, कलंदर वृत्ती, संकोची स्वभाव, दूरस्थता, प्रेम, सहिष्णुता अशा विविध आणि पुष्कळ वेळा विरोधीही प्रवृत्तींचा सुंदर गोफ म्हणजे तात्यासाहेबांचे जीवन. त्याचे सुरेख चित्रण आपल्याला ’तो प्रवास सुंदर होता’ मध्ये मिळते. या ग्रंथामध्ये कुसुमाग्रजांचे चरित्रकथन आणि साहित्य-परामर्श एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की, त्यातून एक इंद्रधनूचा सुंदर गोफ विणला गेला आहे.

हा ग्रंथ वाचताना कुसुमाग्रजांचे जीवन आणि साहित्य एकमेळाने उभे राहते आणि एका उदास आनंदाने चित्तवृत्ती भारून जातात.
-सु. रा. चुनेकर

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार 2001
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांच्यातर्फे लक्षणीय गद्य साहित्य पुरस्कार 2001
पृष्ठसंख्या: 
215
किंमत: 
रु. 175
ISBN No: 
ISBN 978-81-7434-543-1

महाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी?
कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर?
कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक?
काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती?
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या
उत्खननांमधून मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे
सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ
पद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी सांगितलेली

महाराष्ट्राची कुळकथा

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
1) ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा गणेश सरस्वती ठाकूरदेसाई पुरस्कार (2012)
पृष्ठसंख्या: 
152
किंमत: 
रु. 140
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
July, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-542-4

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती.
देशोदेशींच्या संस्कृतींचे रंग किती आगळेवेगळे!
आजच्या जागतिकिकरणाच्या जमान्यात देशादेशांमधील
चलनवलन वाढतंय. आज इथे तर उद्या तिथे, या वेगानं
जगाला कवेत घेऊ पाहणा-या ‘ग्लोबल नोमॅड्स’ची-
जागतिक भटक्याविमुक्तांची- संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
वेगवेगळ्या देशांशी संपर्क ठेवताना साहजिकच तिथल्या
स्थानिक संस्कृतीशी संबंध येतोय. हा संबंध परस्परांना
टोचणारा-बोचणारा ठरू नये, उभयपक्षी लाभदायक अन्
सुखकारक ठरावा म्हणून आंतरसांस्कृतिक साक्षरतेची गरज
जाणवतेय. अशी साक्षरता मिळवायची म्हणजे अनोळखी
परक्याला समजून घ्यायला शिकायचं, एक दोन वैयक्तिक
अनुभवांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याची घाई न करता
थोडा समजूतदारपणा दाखवायचा, परक्या संस्कृतीचा तसा
स्वभावरंग का तयार झाला, हे जाणून घ्यायचं ....

अशी आंतरसांस्कतिक साक्षरता पसरवण्याचं काम करणारी
विद्याशाखा म्हणजे ‘इंटरकल्चरल कम्युनिकेशन’.
या विद्याशाखेत मनापासून रमलेल्या वैशाली करमरकर यांनी
या वेगळ्या क्षेत्राची करून दिलेला ही ओळख...
एका नव्या जगाची कवाडं खोलणारी...
विश्र्वबंधुत्वाचं मूल्य मनामनात जागवणारी...

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
2) ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा स. रा. गाडगीळ पुरस्कार (2012)
पृष्ठसंख्या: 
324
किंमत: 
रु. 280
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
July, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-557-8

लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला
आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला.
त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या
दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं.
संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला,
आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं.
हे सारं कसं घडत गेलं,
ते सांगणारी चरित्र कादंबरी

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह. ना. आपटे पुरस्कार (2012)
पृष्ठसंख्या: 
424
किंमत: 
रु. 340
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
May, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-520-2

मृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणा-या मुलीपासून ते वृद्धाश्रमात राहणा-या वृद्धेपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे. जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणा-या कथा आहेत.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा शरच्चंद्र चिरमुले पुरस्कार (2012)
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
पुणे मराठी ग्रंथालय आणि सुविचार प्रकाशनाचा `राजेंद्र बनहट्टी’ पुरस्कार (२०११-१२)
पृष्ठसंख्या: 
164
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-521-9

या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत.
या आहेत विज्ञान प्रयोगकथा.
आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून
केलेले प्रयोग मांडणा-या आणि
या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत
समजावून देणा-या कथा.
मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी
'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी
ही आहे

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा वि. वि. बोकिल पुरस्कार (2012)
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार -2010-11; राजा केळकर पुरस्कार
पृष्ठसंख्या: 
120
किंमत: 
रु. 90
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
August, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-588-2

एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा...
एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध!

मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं,
अनेक नवे नाटककार / कलावंत घडले,
मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या;
हे सारं घडलं, ते बाईंमुळे.

वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट...
स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची,
आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत.

आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम
वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय!

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
भैरू रतन दमाणी पुरस्कार 2012
पृष्ठसंख्या: 
456
किंमत: 
रु. 375
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
July, 2013