ISBN No: 
ISBN 978-81-7434-119-8

'माझं आयुष्यच नाटयमय आहे.
तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव
माझ्या चित्रपटांवर पडणारच.
त्यातील सारं वास्तव
मी स्वत:च अनुभवल्यामुळे
माझे चित्रपट जिवंत वाटतात.
नकळत मी लोकांना
जीवनातलं दु:ख दाखवून देतो.'
आपल्या हस-या मुखवटयातून
जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या
मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
केसरी मराठी संस्था व श्रीशिवाजी मंदिर संस्था यांच्यातर्फे साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक 1992-93
पृष्ठसंख्या: 
520
किंमत: 
रु. 375
प्रथम आवृत्ती: 
1993
सद्य आवृती: 
February, 2011
ISBN No: 
978-81-7434-419-9

ती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वांत मोठं- दृष्टिहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले.
डोळयांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणाऱ्या गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व समजावून घेणारी खंबीर आई. आणि तिच्या अथक साथीनं मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09
पृष्ठसंख्या: 
224
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2008
सद्य आवृती: 
March, 2011

एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न-

सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे, जगातील दुरिताच्या नाशाचे.
या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला-
विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण -

हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले?
विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2002-03
पृष्ठसंख्या: 
99
किंमत: 
रु. 50
ISBN No: 
ISBN 978-81-7434-189-1

स्वामी विवेकानंद - एक झंझावात
त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार.
धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक
विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व.
या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन
घडविणारे चरित्र.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दिले जाणारे कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी उत्कृष्ट चरित्रग्रंथाचे पारितोषिक 1991-92
पृष्ठसंख्या: 
304
किंमत: 
रु. 260
प्रथम आवृत्ती: 
1991
सद्य आवृती: 
August, 2013
ISBN No: 
978-81-7434-218-8

आपले सारे आयुष्य पक्ष्यांच्या रंगभर्‍या सुंदर विश्वावर उधळून देणार्‍या
ऋषितुल्य पक्षितज्ज्ञाची आणि जागरूक पर्यावरणवाद्याची जीवनकथा.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1990-91
पृष्ठसंख्या: 
102
किंमत: 
रु. 100
प्रथम आवृत्ती: 
1990
सद्य आवृती: 
September, 2011
ISBN No: 
978-81-7434-405-2

'अल्पसंख्य' या नावामुळे मनात उभ्या राहणाऱ्या 'त्याच न् त्याच' प्रश्नांना पूर्ण छेद देणारी...
बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर 'अल्पसंख्य' आणि 'बहुसंख्य' या दोन्ही प्रकारच्या
तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी...
कोणताही 'अभिनिवेश' नसलेली सुंदर कादंबरी -

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
348
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2008
ISBN No: 
978-81-7434-166-2

Before it came to be called “Googly” the
delivery bowled through the back of the hand
was called “Bosie” after a certain
Mr.Bosanquet. It caused confusion among
batsmen. The “googly” of Dilip Prabhavalkar
causes hilarity among everybody with a sense
of humor. Should we then call it “Prabhie”?
Sunil Gavaskar

क्रिकेट मैदानावर फलंदाजांना नाचविणारे गुप्ते, चंद्रशेखर, कादिर असे
कैक गुगली गोलंदाज बघितले. परंतु मैदानाबाहेर आमच्या विकेटी घेणारा
दिलीपचा गुगली अफलातूनच !
संदीप पाटील

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1988-89
पृष्ठसंख्या: 
138
किंमत: 
रु. 110
प्रथम आवृत्ती: 
1991
सद्य आवृती: 
February, 2011
ISBN No: 
ISBN 978-81-7434-373-4

भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून
'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, 'चौकटराजा' मधल्या नंदू आणि 'श्रीयुत
गंगाधरे टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या
गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा
मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे
निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.

दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ.
बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच
येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या
हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात!
'गुगली', 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम'
नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक!
प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
196
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
September, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-339-0

ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची!

हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी
केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची
ही विचारप्रवर्तक कथा आहे...

जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा
रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या
एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे...

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06
पृष्ठसंख्या: 
432
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2005
ISBN No: 
978-81-7434-677-3

समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि खर्‍याखुर्‍या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या पारधी जमातीची ही आक्रोशकथा आहे. त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोयर्‍यांच्या उत्कर्षासाठी झटणार्‍या एका तळमळीच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने मांडलेली ही कैफियत आहे. त्या समाजाच्या चालीरीती, पंचायतीकडून न्याय करण्याच्या नावाखाली केला जाणारा अन्याय-अत्याचार याबद्दलची वर्णने वाचून अंगावर शहारे उभे राहतात, तर संघकार्यकर्त्यांच्या पाठबळावर होत असणारे परिवर्तन पाहून अंधुकशी का होईना, पण आशाही पालवते. चित्रकथी शैलीतील हे विलक्षण प्रत्ययकारी लेखन सर्व थरांतून गौरवले गेले आहे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06
पृष्ठसंख्या: 
400
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
April, 2014