ISBN No: 
ISBN No.978-81-7434-047-4

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,
एका विचित्र वळणावर
सारी मानवजात येऊन ठेपली आहे.
आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच
पर्याय उरलेले आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्यार
आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर
हताशपणे वाटचाल करायची
किंवा परत मागे फिरून कार्व्हरने
दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या
संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण
या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.
भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया
घालायचा असेल तर
प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच
हवे असे पुस्तक.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1981-82
पृष्ठसंख्या: 
184
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
1981
सद्य आवृती: 
January, 2014
ISBN No: 
ISBN 978-81-7434-098-6

लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून 1906 साली त्याने
मायदेश सोडला.
अमेरिकेत कृषिशिक्षण घेत असतानाच त्याने क्रांतिकेंद्रे काढली.

गदर उठावाच्या आखणीत तो आघाडीवर होता. लाला हरदयाळ,
पं. काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेन्द्रनाथ चट्टोपाध्याय,
भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्याचे सहकारी होते.

सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्याने जपान, अमेरिका,
कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि
अपार साहसे अंगावर घेतली.

डॉ. सन् यत सेन आणि डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे त्याचे
आदर्श होते. म्हणूनच सशस्त्र स्वातंत्र्यलढयानंतर पंचवीस वर्षे
मेक्सिकोत कृषिक्रांती घडवून आणण्यासाठी तो झटत होता.

स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी
तो मोठया उमेदीने मायदेशी परतला.

इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या
वाटयाला आली
ना चिरा ..... ना पणती ....

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1997-98
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मारवाडी संमेलन : घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार 1998
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दिले जाणारे कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी उत्कृष्ट चरित्रग्रंथाचे पारितोषिक 1999
पृष्ठसंख्या: 
260
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
1997
सद्य आवृती: 
September, 2014
ISBN No: 
978-81-7434-103-7

महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला.

मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्‍याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला.
मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.

पृष्ठसंख्या: 
640
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
1988
सद्य आवृती: 
January, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-050-4

तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत,
तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य
धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.
जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.

गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्‍या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मथुराबाई सार्वजनिक वाचनालय, बीडतर्फे दिला जाणारा महात्मा फुले साहित्य व वाङ्मय पुरस्कार 1991-92
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली 1992
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार 1992
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
पुणे नगर वाचन मंदिराचा कै. श्री. ज. जोशी पुरस्कार 1992
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कै. वामन मल्हार जोशी पारितोषिक 1992-93
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार 1992-93
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
मारवाडी संमेलन : घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार 1992-93
पृष्ठसंख्या: 
484
किंमत: 
रु. 325
प्रथम आवृत्ती: 
1991
सद्य आवृती: 
June, 2013
ISBN No: 
ISBN 978-81-7434-132-7

गप्पांच्या ओघात एकदा दुर्गाबाई मला म्हणाल्या, ''मला जगण्याचं सुख वाटतं बघ.'' बाईंच्या या बोलांचा मला अपार विस्मय वाटला. त्यांचं हे विधान मला थोडंसं धाष्टर्याचंही वाटलं. कारण आपण माणसं नेहमी कशा ना कशासाठी सतत कुरकुरत असतो. तर मनाला, बुध्दीला व्यग्रता असता, काही ना काही सतत दुखतखुपत असता ही एकोणनव्वद वर्षांची बाई म्हणते, ''मला जगण्याचं सुख वाटतं बघ.'' यामागचं रहस्य कशात आहे? ते आहे बाईंच्या जीवनोत्साहात. त्यांच्या वृत्तीमध्ये नित्य ताजेपणा आहे. त्यांना जगाबद्दल, जगण्याबद्दल अपार उत्सुकता आहे. ज्ञानाची परमकोटीची ओढ आहे. आपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो. त्यांना जग, जगणं शिळं वाटत नाही. म्हणूनच त्यांना म्हातारपणाची अडचण वाटत नाही, की मृत्यूचं भय वाटत नाही. जगण्याचं सुख वाटतं...

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1998-99
पृष्ठसंख्या: 
258
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
1998
सद्य आवृती: 
May, 2010
ISBN No: 
978-81-7434-260-7

गांधी - काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर.
गांधींनी एका धाग्यात देश जोडला! मनं सांधली! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत.
धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्या समोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं-सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं.
महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी... या आणि अशाच काही जिवलग सहकार्‍यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2003-04
पृष्ठसंख्या: 
161
किंमत: 
रु. 175
प्रथम आवृत्ती: 
2003
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
978-81-7434-447-2

भारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त करण्यासाठीच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच ’शास्त्रीय संगीत’ म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान रससिद्धांत समजून घेतल्याशिवाय अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी किंवा आत्मशोधासाठी, आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. एका अभिजात कलावंताचे प्रदीर्घ चिंतन तिच्याच शब्दांत... विचारवंतांनाही विचारप्रवृत्त करणारे, दिशा देणारे...

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09
पृष्ठसंख्या: 
184
किंमत: 
रु. 290
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
February, 2011

हा कवी सह्याद्रीच्या कुशीत जन्मला.

अठराविश्वे दारिद्र्यात वाढला.
रोजगार हमीवर काम करता करता त्यानं अन्याय पाहिला.
पण त्यामुळेच निसर्गाचा झंकार आणि हृदय पिळवटून
टाकण्याची शक्ती घेऊन कविता लिहायला लागला.
तुकारामाची कविता अंधार दूर करण्यासाठी आपल्याकडून
शक्य होईल तेवढा उजेड पाडत वितळून जाणार्‍या पणतीसारखी आहे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
87
किंमत: 
रु. 175
ISBN No: 
978-81-7434-230-0

तसं तर काल उत्कटपणे ’जगलेलं’ सारं तितक्याच ताजेपणानं आपल्या नजरेसमोर आजही उभं असतं-नवे अर्थ हाती घेऊन! लक्षात येत असतं की, आपला बहुतेकांचा भोवताल वरवर सारखाच आहे, पण तरीही प्रत्येकाचं प्राक्तन निराळं, निर्णय निराळे, स्वीकार-नकार निराळे, कारण इथं प्रत्येक व्यक्ती दुसरीहून निराळी! स्वतंत्र! माणसाच्या जगण्यात प्रातिनिधिक असं काही नाही. अगदी आपणसुद्धा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचं अनुभवत असतोच की! जितकी आपली ’उमजण्या’ची ताकद मोठी, तितकं आपलं ’भंगणं’ अधिक! ’उमजून’ घेण्याच्या मनानं मांडलेल्या या खेळात म्हणूनच सोबत उरते ती फक्त एकटेपणाची तीप संवेदना! जाणिवेच्या अथांग आकाशात झेप घेऊ पाहणारा प्रत्येक हंस अकेला आहे, तो या अर्थानंच! वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळं, परंतु तरीही हे ’अकेलापन’ अधोरेखित करणार्‍या मेघना पेठेंच्या कथा.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उत्कृष्ट कथासंग्रहाचे आनंदीबाई शिर्के पारितोषिक 1997-98
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
इचलकरंजी एज्युकेशनल ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्टचे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार 1997-98
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
श्री. दा. पानवलकर स्मृती पुरस्कार 1998
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार 1998
पृष्ठसंख्या: 
166
किंमत: 
रु. 150
सद्य आवृती: 
September, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-322-2

'ब्र' उच्चारणं सोपं नसतंच कधीही.
'ब्र' म्हणजे अवाक्षर.
'गप्प बस... नाहीतर...' या धमकीला न भिता
धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र!
स्वत:बाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय.

मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशा
एकीचा सुरू झालेला प्रवास.
बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग.
एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल.
त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि
स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील!

हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी
वाड्यापाडे अशा सगळयांना सामावून घेतं.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06
पृष्ठसंख्या: 
338
किंमत: 
रु. 275
प्रथम आवृत्ती: 
2005
सद्य आवृती: 
December, 2011